Next
‘स्टार हेल्थ’ची डायबेटीस पॉलिसी नव्याने दाखल
प्रेस रिलीज
Saturday, September 01 | 05:01 PM
15 0 0
Share this story

चेन्नई : स्टार हेल्थ अँड अॅलिड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीने अधिक मूल्यांचा समावेश करून व हप्त्यामध्ये कपात करून स्टार डायबेटीस सेफ इन्शुरन्स पॉलिसी नव्याने दाखल केली आहे. स्टार डायबेटीस योजना आता १५ ते २० टक्के कमी दरामध्ये खरेदी करता येऊ शकते.

नव्याने दाखल केलेल्या योजनेमध्ये विम्याच्या रकमेइतक्या वैयक्तिक अपघात कवचाबरोबरच, डॉक्टरांचे कन्सल्टेशन शुल्क, डायग्नॉस्टिक चार्जेसची भरपाई, फार्मसी बिले यांचाही समावेश करण्यात आला आहे. ग्राहकांना अतिशय कमी प्रीमिअममध्ये हे अतिरिक्त फायदे देण्यात येणार आहेत.

मूळ योजनेनुसार, कितीही वर्षे डायबेटीस असलेल्या व्यक्तीला (नियमित हॉस्पिटलायझेशन कव्हरसह) कवच देण्यात आले व डायबेटीसची सद्यस्थिती काहीही असली तरी आरोग्य विमा कवच घेणे शक्य होते. सध्या उपलब्ध असलेल्या कव्हरबरोबरच, सुधारित योजनेमध्ये सर्व प्रकारच्या डे केअर उपचारांचा समावेश करण्यात आला आहे.

योजनेतील बदलांविषयी बोलताना ‘स्टार हेल्थ’चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. एस. प्रकाश, म्हणाले, ‘आमच्या ग्राहकांसाठी अतिरिक्त फायदे समाविष्ट करून, स्टार डायबेटीस सेफ इन्शुरन्स योजना नव्याने दाखल करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. बाजारातून चांगला प्रतिसाद मिळत आहे व आमच्या सेल्स टीमकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच आम्हाला या उत्पादनात सुधारणा करण्याची व डायबेटीस असलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्याची प्रेरणा मिळाली. आज स्टार डायबेटीस सेफ इन्शुरन्स पॉलिसी या क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण व एकमेव योजना आहे.’

‘दाव्यांवर प्रक्रिया करण्यासाठी व आमची नाविन्यपूर्ण उत्पादने तयार करण्यासाठी आम्ही ४०० वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेतो. आमच्या कंपनीतील वैद्यकीय कर्मचारी उत्पादनांची आखणी करत असल्याने व सेवा देत असल्याने, ग्राहकांना परिणामकारक सेवा देण्यासाठी आम्हाला मदत करतात,’ असे डॉ. प्रकाश यांनी नमूद केले.

सध्या टाइप वन व टू डायबेटीस असलेल्या व्यक्तींना ही योजना खरेदी करता येऊ शकते. प्री-पॉलिसी मेडिकल चेक-अप न करता योजना खरेदी करणे शक्य असून, मेडिक्लेम कव्हरबरोबरच, डायबिटीस व त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत यांवरील उपचारांचा, तसेच इन्सुलिन व HbA1c वैद्यकीय चाचण्या यांचा यात समावेश करण्यात आला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link