Next
‘जजमेंट’चा थरारक टीझर प्रदर्शित
अभिनेता मंगेश देसाई प्रथमच खलनायकाच्या भूमिकेत
BOI
Saturday, April 20, 2019 | 06:07 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मराठी चित्रपट ‘जजमेंट’ सर्वांची उत्सुकता वाढवणारा ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. त्यावरून तो एक थरारपट असेल, असा अंदाज येत होता. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून तो अंगावर शहारा आणणारा आहे. 

अभिनेता मंगेश देसाई, तेजश्री प्रधान आणि माधव अभ्यंकर हे टीझरमध्ये दिसतात. यापूर्वी कधीही दिसला नाही अशा अवतारात मंगेश देसाई दिसतो. या चित्रपटाच्या निमित्ताने मंगेश देसाई पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. जेमतेम २० सेकंदांच्या या टीझरमध्ये एका स्त्री चा रडवेल्या आवाजात, ‘माझ्या जीवाला धोका आहे इथे’, असा संवाद ऐकू येतो. तो शांतता भंग करतो. 

नील सत्यनारायण यांच्या ‘ऋण’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणुक आयुक्त आणि निवृत्त सनदी अधिकारी अशी ओळख असलेल्या नील सत्यनारायण यांनी लिहिलेली ही कादंबरी आहे. ज्योत्स्ना फिल्म प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर रमेश सुर्वे यांनी केले आहे. एक थरारपट असलेल्या या चित्रपटात मंगेश देसाईचा नव्या रुपातला अभिनय पाहणे उत्सुकतेचे असेल, हे नक्की...

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search