Next
डुगवे येथील लोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा
BOI
Saturday, December 22, 2018 | 05:20 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : तालुक्यातील डुगवे येथील श्री स्वयंभू देव लोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा २३ व २४ डिसेंबर २०१८ रोजी होणार असून, त्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२३ डिसेंबरला सकाळी नऊ ते १० या वेळेत कलश मिरवणूक, सकाळी १० ते दुपारी दोन या वेळेत संप्रोक्षण विधी, दोन ते तीन या वेळेत आरती, दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत भजन आणि रात्री १० वाजता ‘माझं गाव माझी संस्कृती’ या सांस्कृतिक कार्यक्रम होईल.  २४ डिसेंबरला सकाळी ११ वाजता कोल्हापूर येथील श्री जगद्गुरू स्वामी शंकराचार्य करवीर पीठाचे प.पू. विद्यानृसिंह भारती स्वामी यांचे आगमन व मिरवणूक होईल. ११.३० ते १२.३० या वेळेत कलश प्रतिष्ठान सोहळा होईल. १२.३० ते एक या वेळेत आरती होईल. त्यानंतर सायंकाळी चार वाजेपर्यंत महाप्रसाद होईल. दरम्यान दुपारी एक ते दोन या वेळेत मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडेल. सायंकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत भजनाचे कार्यक्रम होतील. त्यानंतर रात्री १० वाजता बहुरंगी नमनाचे सादरीकरण होईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link