Next
‘स्टार प्रवाह’वर नवा कॉमेडी शो पाच जुलैपासून सुरू
जॉनी लीवर, निर्मिती सावंत, भरत जाधव परीक्षकाच्या भूमिकेत
प्रेस रिलीज
Friday, June 21, 2019 | 01:54 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘स्टार प्रवाह’ या मराठी वाहिनीवर ‘एक टप्पा आउट’ हा नवा कॉमेडी शो पाच जुलैपासून सुरू होत आहे. शुक्रवार ते रविवार रात्री आठ वाजता प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अस्सल विनोदवीरांचा शोध घेतला जाणार आहे. या शोसाठी कॉमेडीचा बादशाहा जॉनी लीवर यांच्यासह निर्मिती सावंत आणि भरत जाधव हे मराठी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार परीक्षाच्या भूमिकेत असणार आहेत. 

मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि रत्नागिरी येथे झालेल्या ऑडिशनमधून तब्बल ३६ स्पर्धकांची निवड करण्यात आली असून, या स्पर्धकांमधून १६ स्पर्धकांमध्ये कॉमेडीची लढत रंगणार आहे. 

या अनोख्या कार्यक्रमाविषयी सांगताना जॉनी लीवर म्हणाले, ‘‘स्टार प्रवाह’ वाहिनीने ‘एक टप्पा आउट’च्या निमित्ताने नव्या टॅलेंटसाठी खूप मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या अनोख्या संधीचा लाभ सर्वांनीच घ्यायला हवा. ‘एक टप्पा आउट’मध्ये माझा सहभाग आहे याचा एक महाराष्ट्रीयन म्हणून मला अभिमान आहे.’

निर्मिती सावंत आणि भरत जाधवदेखील या शोसाठी खूपच उत्सुक आहेत. ‘स्पर्धकांचा उत्साह आणि टॅलेंट खरोखर थक्क करणारे आहे. या मुलांकडून खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. ‘स्टार प्रवाह’ने खूप चांगला कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. खळखळून हसण्याचे निमित्त ‘एक टप्पा आउट’ तुम्हाला देईल याची आम्हाला खात्री आहे,’ अशी भावना निर्मिती सावंत आणि भरत जाधव यांनी व्यक्त केली.

‘सध्या जगाला हसण्याची आणि हसवण्याची गरज आहे. यासाठीच ‘स्टार प्रवाह’ने ‘एक टप्पा आउट’सारखा अनोखा स्टॅंडअप कॉमेडी आणला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या टॅलेंटचा शोध या कार्यक्रमातून घेतला जाईल. दिग्गज परीक्षक आणि सुप्रसिद्ध कलाकार मंडळींच्या सानिध्यात नवख्या कलाकारांना मार्गदर्शन केले जाईल. मनोरंजनाने परिपूर्ण असा हा कार्यक्रम असेल,’ अशी प्रतिक्रिया ‘स्टार प्रवाह’चे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांनी व्यक्त केली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search