Next
‘कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही’
विधानपरिषदेतील प्रश्नोत्तरादरम्यान आशिष शेलार यांची ग्वाही
प्रेस रिलीज
Friday, June 21, 2019 | 02:31 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राज्यातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी २० जून रोजी विधानपरिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. वंचित व दुर्बल घटकांतील बालकांसाठी खाजगी शाळांमधील शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के जागा राखून ठेवण्यात येतात. त्यांतर्गत राज्यातील शाळाप्रवेशांची कार्यवाही येत्या ३१ जुलैपर्यंत पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रतिपूर्ती शुल्क प्रलंबित असल्याबाबत प्रकाश गजभिये यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावरील चर्चेत शेलार यांच्यासह हेमंत टकले, ॲड. राहुल नार्वेकर, ॲड. अनिल परब आदी सहभागी झाले होते.

अधिक माहिती देताना शेलार म्हणाले, ‘शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राज्यात एकूण एक लाख १६ हजार ७७९ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या जागांसाठी दोन लाख ४४ हजार ९३४ अर्ज प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत ५० हजार ५०५ बालकांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून, उर्वरित प्रक्रिया ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येईल. शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांव्यतिरिक्त उर्वरित विद्यार्थ्यांना इतर शाळेत प्रवेश देण्यात येईल.’

शिक्षण हक्क कायदा २००९मध्ये लागू झाला. त्यावेळी शालेय स्तरावर प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर २०१५-१६ पासून ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली. या कायद्याअंतर्गत शासनामार्फत करण्यात येणाऱ्या शुल्क प्रतिपूर्तीच्या रकमेसाठी अर्थसंकल्पात १५० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली असून २०१७-१८या शैक्षणिक वर्षासाठी ५० टक्के शुल्क प्रतिपूर्ती झाली आहे. २०१८-१९साठीची शुल्क प्रतिपूर्ती करणे बाकी आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search