Next
पवार आणि मुंडेंकडून अटलबिहारी वाजपेयींना आदरांजली
प्रेस रिलीज
Monday, November 19, 2018 | 04:41 PM
15 0 0
Share this story

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी हिवाळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेत शोकप्रस्तावावर माजी मंत्री आनंदराव देवकाते, माजी राज्यमंत्री वसंतराव धोत्रे, शिवाजीराव नागवडे, वैजनाथराव आकात, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि कॉम्रेड माधवराव गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली.

या वेळी बोलताना पवार म्हणाले, ‘अटलबिहारी वाजपेयी यांची भाषणे ही अमुल्य ठेवा होती आणि आहेत. ते राजकारणातील आधारस्तंभ होते. त्यांचे भाषण नेहमीच मार्गदर्शन करणारे असायचे. कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानला धुळ चारली. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे देशाची धुरा होती. कारगिल युद्धानंतर पाकिस्तानने पुन्हा काही केले नाही. दोन्ही देशांचे संबंध चांगले रहावेत त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. समझोता एक्सप्रेस सुरू केली. त्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला; परंतु देशात एकोपा रहावा यासाठीही ते सदैव कार्यरत होते. त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी यांचा विसर कधीच देशाला होणार नाही.’

वाजपेयींच्या अनेक आठवणींना उजाळा देत मुंडे म्हणाले, ‘देशवासियांच्या मनात एकाधिकारशाही... हुकुमशाहीची भीती दाटून आली असताना ‘अटल’सूर्याच्या तेजाची ओळख समाजाला करून देण्यासाठी माझ्यासारख्या असंख्य काजव्यांची आज गरज आहे. अटलजींच्या बीड व मराठवाड्यातल्या सभांची जबाबदारी माझ्यावर असायची. मी देखील ती निष्ठेने, प्रेमाने पार पाडायचो. प्रभू रामचंद्रांनी रामसेतू बांधण्यात एका खारीचा जो वाटा होता तितकाच माझा पक्षकार्यातला तो वाटा होता. अटलजींच्या एका सभेचे मी सूत्रसंचालन केले. सभेनंतर अटलजींनी मला जवळ बोलावून माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. प्रभू रामचंद्रांनी खारीच्या पाठीवर मारलेल्या शाबासकीची अनुभूती मी त्यादिवशी घेतली व ती थाप आजही मी अभिमानाने, आनंदाने मिरवतोय.’

‘भारतीय राजकारणाला नैतिक अधिष्ठान देण्यात अटलजींचे महत्त्वाचे योगदान आहे. संपूर्ण जीवन राष्ट्रकार्याला वाहून घेतलेले ते नेते होते. देशाच्या प्रगतीतील त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्यासारखा सर्वमान्य नेता पुन्हा होणार नाही,’ अशा शब्दांत मुंडे यांनी वाजपेयींबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link