Next
१० ऑक्टोबरला होणार विक्रम; १२२ भाषांमधील गाण्यांचे सलग १३ तास सादरीकरण
गायिका मंजुश्री ओक यांनी आयोजित केला ‘अमृतवाणी-अनेकता में एकता’ उपक्रम
BOI
Tuesday, October 01, 2019 | 02:55 PM
15 0 0
Share this article:

मंजुश्री ओकपुणे : सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्षानिमित्त पुण्यातील गायिका मंजुश्री ओक यांनी एक अनोखा उपक्रम ठरवला आहे. येत्या १० ऑक्टोबर रोजी त्या सलग १३ तास १२२ भारतीय भाषांमधील गाणी सादर करणार आहेत. या विक्रमाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी एक ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत या उपक्रमाची घोषणा केली.

या वेळी बोलताना ते म्हणाले, ‘भारतात १२२ भाषा आहेत, याचा शोध मला या उपक्रमामुळे लागला. मंजुश्री ओक ही गुणी गायिका आहे. या आधी तिने १२१ गाण्यांचा विक्रम केला होता. तिच्या या नव्या उपक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये व्हावी, अशी माझी इच्छा आहे. हा मोठा उपक्रम आहे. रसिकांनी तिला हिंमत आणि प्रोत्साहन दिले पाहिजे.’

श्री यशलक्ष्मी आर्ट संस्थेमार्फत ‘अमृतवाणी – अनेकता में एकता’ हा कार्यक्रम १० ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी साडेदहा ते रात्री साडेअकरा या वेळेत पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सादर होणार आहे. मंजुश्री ओक सलग १३ तास विविध भाषांमधील वेगवेगळ्या रचना एकट्याने सादर करणार आहेत. पुण्यातील नामवंत वादक, निवेदक आणि तंत्रज्ञांचा यात सहभाग असून, मान्यताप्राप्त भाषातज्ज्ञ, संगीततज्ज्ञ आणि विविध अभ्यासकही या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. 

मंजुश्री ओक म्हणाल्या, ‘१२२ वेगवेगळ्या भाषांमध्ये सादरीकरण करत असताना ते संगीताच्या वैश्विक भाषेतून करणार आहे, याचा आनंद आहे. भारतीय भाषा मुख्य प्रवाहात आणणे आणि त्याचे संवर्धन व्हावे या उद्देशाने हा कार्यक्रम करत आहे. संगीत ही हृदयाची भाषा आहे. त्यामुळे जगभरात सगळीकडे ती पोहोचू शकते. ९९पैकी ३४ भाषा परिचयाच्या आहेत, तर उर्वरित ज्यावर संशोधन सुरू आहे, फार थोड्या प्रमाणात त्यातील साहित्य उपलब्ध आहे, अशा आहेत. लावणी, गझल, बंदिश, लोकसंगीत असे सगळे प्रकार यात समाविष्ट केले आहेत. काही रचना नवीन केल्या आहेत. भाषेचा लहेजा, उच्चारण योग्य होते आहे की नाही हे पाहण्यासाठी भाषातज्ज्ञ आणि संगीततज्ज्ञ नियुक्त केले जाणार आहेत. २३ मेपर्यंत भाषा आणि गीतांचे संकलन करत होतो. भाषेची मान्यता गिनीजकडून मिळाल्यानंतर सांगीतिक तयारीला सुरुवात केली आहे. असा उपक्रम जगभरात कुठेही झालेला नाही, त्यामुळे गिनीज बुकमध्ये नोंद व्हावी याकरता प्रयत्न करत आहोत.’ 

२०१९ हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाकडून आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा (स्वदेशी भाषा) वर्ष म्हणून साजरे होत आहे. त्यानिमित्त आपल्या देशातील भाषावैभव एकत्रितपणे सादर करण्याच्या हेतूने मंजुश्री ओक यांनी १२२ भारतीय भाषांमधील गीतांचे सादरीकरण एकाच कार्यक्रमात करण्याचा संकल्प केला आहे. अशा प्रकारचा हा जगातील पहिलाच कार्यक्रम आहे. मंजुश्री ओक या पुण्यातील एक प्रथितयश गायिका असून, श्री यशलक्ष्मी आर्ट संस्थेच्या संस्थापिका आहेत. २०१७ आणि २०१८ अशी सलग दोन वर्षे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् आणि ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये दोन विक्रम नोंदविणाऱ्या त्या एकमेव आशियायी गायिका आहेत. या वर्षीही एक नवीन विक्रम नोंदवण्यासाठी हा अनोखा कार्यक्रम घेऊन त्या रसिकांसमोर येत आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
अशोक गं. सोनाळकर About 14 Days ago
अप्रतिम आणि स्तुत्य उपक्रम! विशेष म्हणजे सादरीकरण प्रसिद्ध, नावाजलेल्या मराठी कलावंता कडून होतंय. अतिशय अभिमानास्पद गोष्ट. भरपूर शुभेच्छा!!!!! जय महाराष्ट्र******
0
0
Mrunal Datar About 15 Days ago
मंजूश्री तुझा आशा भोसलेचां प्रोग्राम ऐकला होता .खूप सुंदर गायलीस ,खूप कष्ट घेऊन गाणी सादर केलीस ,पुढील वाटचालीस साठी तुला खूप खूप शुभेच्छा .
0
0
हर्षा About 15 Days ago
आपणास अनेक शुभेच्छा
0
0
Ajit Kumthekar About 15 Days ago
....खुपच स्तुत्य व कौतुकास्पद उपक्रम .....All the BEST
0
0
Ajit shiralkar About 15 Days ago
Greatest work we r sure you only can do it Keri it up we r with you all the best MANJU
0
0
Vilas Nadgauda About 15 Days ago
Wish you all the success,,
0
0
अनिल गद्रे. About 15 Days ago
आपला हा उपक्रम अद्वितीय आणि योग्य निमित्याने साजरा करीत अहात त्यामुळे आम्हालाही त्याचा अभिमान आहे. आपण निश्चित यशस्वी व्हाल ह्याची खात्री आहे. आपणास खुप खुप शुभेच्छा.
1
0
POTDAR MUKUND R About 16 Days ago
छान .. अनेक शुभेच्छा
1
0

Select Language
Share Link
 
Search