Next
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे पदवी प्रदान सोहळा
BOI
Monday, February 11, 2019 | 03:55 PM
15 0 0
Share this article:


पुणे : आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा (एआयटी) चौथा वार्षिक पदवीदान समारंभ ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. संस्थेच्या दिघी येथील संकुलात झालेल्या या सोहळ्यात यंदा  २८० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.


या वेळी संस्थेचे संचालक ब्रिगेडीयर अभय भट्ट यांनी यंदाच्या तुकडीच्या कामगिरीचा एक विश्लेषणात्मक अहवाल सादर केला. ते म्हणाले, ‘ या तुकडीतील ९० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मायक्रोसॉफ्ट, डेलॉइट, बॉश, एचएसबीसी अशा विविध उद्योगांमध्ये नोकरी मिळाली असून, त्यांचे सरासरी उत्पन्न सहा ते ३९ लाख  रूपयांच्या दरम्यान आहे. 

डॉ. माशेलकर म्हणाले, ‘अभियांत्रिकी शिक्षणात शाश्वत तंत्रज्ञानाचा समावेश करणे आवश्यक आहे. डिजिटायझेशन, डिकार्बनायझेशन (शाश्वत पर्यावरण) आणि डेमोक्रेटायझेशन ऑफ अॅक्सेस (समाजाची शाश्वतता) या तीन ‘डी’चा समावेश शिक्षणात झाला पाहिजे. यापुढील काळात शैक्षणिक, तसेच कॉर्पोरेट क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजेन्सची महत्त्वाची भूमिका असेल.’

 ‘महत्त्वाकांक्षा म्हणजे संभाव्यता आहेत. कायम मोठ्या महत्त्वाकांक्षा ठेवा. तुम्हाला कॉफी इंस्टंट मिळेल;पण यश इंस्टंट मिळणार नाही. चिकाटीचा फायदा होतो. हार मानू नका. तुमच्या स्वतःच्या संधी निर्माण करा. तुम्ही स्वतःच्या मनावर ज्या मर्यादा घालून घेता त्या वगळता तुमच्या कामगिरीला कोणत्याही मर्यादा नाहीत. त्यामुळे अमर्याद काम करा,’ असे माशेलकर मंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

‘एआयटी’चे अध्यक्ष मेजर जनरल प्रीतम बिष्णोई यांनी आभार मानले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search