Next
सौताडा, खडकत चारा छावणीला शरद पवारांची भेट
समस्याग्रस्त शेतकरी व चारा छावणी मालकांनी मांडल्या व्यथा
प्रेस रिलीज
Monday, May 13, 2019 | 04:52 PM
15 0 0
Share this article:


बीड : जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी आष्टी तालुक्यातील खडकत आणि पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील चारा छावण्यांना भेट दिली. या वेळी समस्याग्रस्त शेतकरी व चारा छावणी मालकांनी पवार यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. 

पवार यांच्या बीड जिल्ह्यात दुष्काळी दौर्‍याला खडकत येथून सुरुवात झाली. याठिकाणी त्यांनी सुमारे अर्धा तास शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांचे प्रश्न अडचणी जाणून घेतल्या. या वर्षी १९७२पेक्षा भयानक दुष्काळाची परिस्थिती आहे. पावसाळ्याला आणखीन दोन महिने असून, अशावेळी पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी धैर्याने सामना करण्याचे आवाहन पवार यांनी शेतकऱ्यांना केले.


सौताडा येथे स्वामी बहुउद्देशीय सेवा संस्थेने २७ मार्चला सुरु छावणी सुरू केली आहे; परंतु अद्यापही छावणीचे अनुदान शासनाने दि नसल्याने व्याजाने पैसे घेवून छावणी चालवण्याची वेळ छावणी चालकांवर आली आहे. यासाठी ९० रुपये दिले जातात; मात्र चाऱ्याचे भाव पाहता ही रक्कम अपुरी असून, पाणीही दूर अंतरावरून आणावे लागत असल्याने छावणीचा खर्च परवडणारा नसल्याचे या वेळी छावणी चालकांकडून सांगण्यात आले. या अनुदानात वाढ करून देण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. 

दुधाचे दर दोन रुपयांनी कमी झाले आहेत. आधीच दुधाचे उत्पादन घटले. शेतकऱ्यांवर हे एक मोठे संकट आले आहे. विम्याचे पैसे मिळाले नाही. फळबागा जळून गेल्या आहेत, त्यासाठी कोणत्या प्रकारचा अनुदान नाही त्या वाचवण्यासाठी ही सुद्धा समस्या आहे, अशा अनेक समस्या, अडचणी शेतकऱ्यांनी पवार यांच्यासमोर मांडल्या. 


जनावराला टॅग लावतात जनावरांची संख्या अचूक राहावी, त्यामध्ये फेरफार होऊ नये म्हणून हा शासनाचा उद्देश असला, तरी टॅग लावून अपलोड करणे हे जिकिरीचे काम आहे. त्यामुळे शासनाने त्यासाठी स्वतंत्र व्यक्ती नेमावी. शासनातर्फे ते केल्यास पारदर्शकतेच्या दृष्टीने चांगले होईल आणि चारा छावणी चालकांवरील हा अतिरिक्त भार कमी होईल, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

या वेळी पवार यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी आमदार उषा दराडे, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, युवा नेते रोहित पवार, बाळासाहेब आजबे, महेंद्र गर्जे, शिवाजी राऊत, सतीश शिंदे, मेहबूब शेख, माजी आमदार राजेंद्र जगताप, बाळासाहेब आजबे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 125 Days ago
At least it is coming into the open . Can some local enterprise , of course , on a scale , bring some relief ? This may not need official approval .
0
0

Select Language
Share Link
 
Search