Next
परमेश्वर देवस्थानच्या यात्रा कमिटी अध्यक्षपदी लक्ष्मणराव शक्करगे
नागेश शिंदे
Saturday, January 19, 2019 | 12:46 PM
15 0 0
Share this story

हिमायतनगर : शहरातील परमेश्वर देवस्थानतर्फे दर वर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यात्रा सब कमिटीच्या अध्यक्षपदी लक्ष्मणराव शक्करगे, सचिवपदी संजय माने, तर उपाध्यक्षपदी सुभाष शिंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीच्यानिमित्ताने हिमायतनगर शहरात भव्य यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चार मार्च २०१९पासून यात्रा उत्सवाला प्रारंभ होणार आहे. दरम्यान उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी यात्रा सब कमिटी स्थापण्यात आली आहे. यात परमेश्वर मंदिर कमिटीचे जेष्ठ संचालक शक्करगे यांची अध्यक्षपदी, उपाध्यक्षपदी शिंदे, तर सचिवपदी युवा कार्यकर्ता माने यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. सदस्य म्हणून संतोष गाजेवर, गजानन चायल, मारोती शिंदे, हनुसिंग ठाकूर, सुनील चव्हाण, गजानन पाळजकर आदींचा समावेश केला आहे. या शिवाय आणखी १५ समित्यांचा समावेश यात्रा कमिटीमध्ये केला आहे.

लक्ष्मणराव शक्करगेगेल्या अनेक वर्षांपासून यात्रा उत्सवाची जबाबदारी या तिघांनी सक्षमरित्या पेलल्यामुळे यंदासुद्धा या तिघांची निवड यात्रा कमिटीवर करण्यात आली असल्याचे मंदिर समितीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीमाळ यांनी सांगितले.  

या वर्षी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विशेष सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, महिला व मुलींच्या दर्शनासाठी विशेष काळजी घेण्यात येणार असल्याचे यात्रा कमिटीचे सचिव माने यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link