Next
देशभरात रोजगार निर्मितीत वाढ
एकट्या मे महिन्यात साडे सात लाख नवीन रोजगार
BOI
Monday, July 23, 2018 | 05:27 PM
15 0 0
Share this story


मागील आठ-नऊ महिन्यांच्या कालावधीत रोजगार निर्मितीत वाढ झाली असल्याचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) केलेल्या एका सर्वेक्षणात लक्षात आले आहे. सप्टेंबर २०१७ ते मे २०१८ या कालावधीत ४४ लाख नव्या रोजगारांची निर्मिती झाली आहे. विशेष म्हणजे एकट्या मे महिन्यात देशभरात सुमारे साडेसात लाख रोजगार निर्माण झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून वेळोवेळी देशभरातील रोजगारनिर्मितीबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध केली जाते. त्यानुसार यंदाची मिळालेली आकडेवारी विशेष आहे. त्यातही एकट्या मे महिन्यातील आकडेवारी ही इतर सात महिन्यांमध्ये उच्चांक गाठणारी आहे. सप्टेंबर १७ ते मे १८ या कालावधीतील रोजगार निर्मितीचे सर्वेक्षण करताना नवीन रोजगारांची भर, नोंदणीकृत कर्मचारी, एकूण उपलब्ध रोजगार अशा सर्व मुद्द्यांचा ‘ईपीएफओ’ने खुलासा केला आहे. 

या आठ महिन्यांच्या काळात देशभरात ४४ लाख ७४ हजार ८५९ नवीन रोजगारांची भर पडली असल्याचे ‘ईपीएफओ’ने म्हटले आहे; मात्र असे असले तरी, नोंदणीकृत कर्मचाऱ्यांच्या अंदाजित आकडेवारीत घट झाली असल्याचे समोर आले आहे. ही घट ९.५७ टक्के इतकी आहे. चालू वर्षापासून ‘ईपीएफओ’ने देशभरातील नवीन सदस्यांची नोंदणी आपल्या अधिकृत पोर्टलवर जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार विक्रमी रोजगारनिर्मिती झालेल्या मे महिन्यात १८ ते २१ या वयोगटातील अडीच लाख, तर २२ ते २५ या वयोगटातील एक लाख नव्वद हजार तरुणांनी ‘ईपीएफओ’कडे नोंदणी केली आहे. 

‘ईपीएफओ’मध्ये संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रातील नोंदणींचा समावेश आहे. निवृत्तिवेतन, विमा कवच, भविष्य निर्वाह अशा सामाजिक सुरक्षांबरोबरच एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड स्कीम, एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड स्कीम आणि पेन्शन स्कीम अशा तीन माध्यमांतून ‘ईपीएफओ’चे कामकाज चालते. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link