Next
अक्षय-परिणीतीच्या ‘केसरी’ची पहिली झलक
पाहता येणार २१ सैनिकांची शौर्यगाथा..
BOI
Tuesday, September 18, 2018 | 02:29 PM
15 0 0
Share this story


बॉलिवूडचा एव्हरग्रीन अभिनेता अक्षय कुमार हा अलीकडील काळात बऱ्याच कारणांनी लोकप्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचा फिटनेस, देशप्रेम, सामाजिक बांधिलकी या सर्व गोष्टींबरोबरच सतत वेगळ्या धाटणीचे आणि ऐतिहासिक चित्रपट यांमुळेही तो सर्वांचा लाडका अभिनेता बनला आहे. आपला वेगळेपणा सिद्ध करण्यासाठी अक्षय आता पुन्हा नव्या जोमाने तयारीला लागला आहे. निमित्त आहे त्याच्या आगामी ‘केसरी’ या चित्रपटाचे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. 

‘एअरलिफ्ट’, ‘रुस्तम’ यांसारख्या ऐतिहासिक कथेवर आधारित दर्जेदार चित्रपटांमध्ये दिसल्यावर अक्षय आता पुन्हा एकदा आपल्याला इतिहासाची सैर घडवून आणणार आहे. १८९७मध्ये लढल्या गेलेल्या सारागढीच्या युद्धातील ३६व्या शीख रेजिमेंटच्या २१ सैनिकांची शौर्यगाथा ‘केसरी’ चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोप्रा अक्षयसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. नुकतीच या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. केसरीचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. 

या पोस्टरमध्ये शीख रेजिमेंटची एक तुकडी दिसते आहे. यातील प्रत्येक सैनिकाच्या चेहऱ्यावर देशभक्ती आणि डोळ्यांत एक करारीपणा असल्याचे दिसून येते. दिग्दर्शक करण जोहर यांनी या चित्रपटाची दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे. पूढील वर्षी २२ मार्च २०१९मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.     
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link