Next
भिवंडीतील दिंडीगडाला लवकरच पर्यटन स्थळाची मान्यता
मिलिंद जाधव
Thursday, December 27, 2018 | 03:26 PM
15 0 0
Share this story

भिवंडीती दिंडीगडाची पाहणी करताना मान्यवर.

भिवंडी : येथील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील प्रसिद्ध दिंडीगडाला पर्यटन स्थळाची मान्यता मिळावी यासाठी भिवंडी पूर्वचे आमदार रूपेश म्हात्रे यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, यादृष्टीने नुकतीच या गडाची पाहणी करण्यात आली आहे.

आमदार म्हात्रे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समिती सभापती सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांच्यासह जिल्हा नियोजन समितीकडे लावून धरली होती. या संदर्भातील शासकीय बाबींचा सतत पाठपुरावा केला आहे. आमदारांच्या मागणीची दखल घेत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी दिंडीगडाची पाहणी करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले होते. त्यानुसार ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमानवार यांनी २५ डिसेंबर २०१८ रोजी दिंडीगडाला भेट देऊन पाहणी केली.या प्रसंगी आमदार म्हात्रे यांच्यासह जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंदारे, जिल्हा उपवनसंरक्षक रामागावकर, भिवंडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अशोक सोनटक्के, पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियंता दत्तू गीते, भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सचिन धात्रक, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश तेलीवरे, समाजसेवक विशुभाऊ म्हात्रे, तानाजी मोरे, सोनाळे  ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्मा इंद्रपाल तरे, उपसरपंच अनिल भेकरे, ग्रामपंचायत सदस्य मढवी, ग्रामविकास अधिकारी नितीन देशमुख, माजी सरपंच जनार्दन वाकडे, यांच्यासह श्री क्षेत्र दिंडेश्वर मंदिर ट्रस्टचे कार्याध्यक्ष,  सदस्य, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी पालकमंत्री शिंदे यांच्याशी अधिकाऱ्यांनी चर्चा केली असता त्यांनी येत्या १५ दिवसांत पर्यटनस्थळाविषयी आवश्यक असलेले अंदाजपत्रक मंजुरीसाठी सादर करावे; तसेच दिंडीगडाला पर्यटनस्थळाचा ‘अ’ दर्जा मिळाल्यास तीन कोटी रुपये निधी मंजूर करून देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे आमदार म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश आले असून, दिंडेश्वर भक्तांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link