Next
हिमायतनगरमध्ये वडाचा गणपती मंडळातर्फे मोफत महाआरोग्य शिबिर
नागेश शिंदे
Monday, September 09, 2019 | 01:56 PM
15 0 0
Share this article:



हिमायतनगर :
हिमायतनगरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हिमायतनगरचे ग्रामीण रुग्णालय व वाढोण्याचा राजा मानाचा वडाचा गणपती यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नांदेड येथील रेणुकाई क्रिटिकल केअर सेंटर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आठ सप्टेंबरला परमेश्वर मंदिरात भव्य मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. 

शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण शक्करगे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिमायतनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भगवान कांबळे होते. भाजपचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन तुप्तेवार, श्यामजी रायेवार, ज्येष्ठ पत्रकार द. ल. मुधोळकर, प्रहार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी बलपेलवाड, विजय वळसे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजय माने, खंडू चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते. 



श्यामजी रायेवार म्हणाले, ‘हिमायतनगर शहरात दर वर्षी या युवकांच्या सहकार्याने अनेक समाजोपयोगी कार्ये घडतात. दोन दिवसांपूर्वी वडाच्या गणपती मंडळातर्फे मोठ्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. असेच समाजोपयोगी कार्य युवकांच्या हातून घडत राहो.’

नांदेड येथून आलेल्या रेणुकाई क्रिटिकल केअर सेंटर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर नीलेश बास्टेवाड, डॉ. पुरुषोत्तम पवार, डॉ. नागेश शाहू, डॉ. अनुप भोकरे, डॉ. प्रशांत मेरगेवाड यांनी शहरातील नागरिकांवर मोफत वैद्यकीय उपचार केले आणि रुग्णाना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली.



वडाच्या गणपती मंडळाचे आशिष सकवान, प्रशांत देवकते, रामभाऊ सूर्यवंशी, सचिन माने, राहुल नरवाडे, परमेश्वर भोयर, मनोज ठाकरे, गोविंद शिंदे, सुमित कागने, विकास नरवाडे, आशु डाके, किशन नरवाडे, अरविंद वानखेडे, सूरज दासेवार, जांबुवंत मिराशे, विशाल काळे आदींनी या वेळी उपस्थित राहून हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search