Next
पॉलिमेडला ‘कंपनी ऑफ द ईअर’ पुरस्कार
BOI
Wednesday, February 20, 2019 | 03:37 PM
15 0 0
Share this story

केंद्रीय मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांच्या हस्ते पॉलिमेडचे व्यवस्थापकीय संचालक हिमांशू बैद यांनी ‘इंडियन मेडिकल डिव्हाइसेस कंपनी ऑफ द ईअर’ पुरस्कार स्वीकारला.

पुणे : पॉली मेडिक्युअर लिमिटेड (पॉलिमेड) या वैद्यकीय उपकरणे तयार करणाऱ्या कंपनीला मानाचा ‘इंडियन मेडिकल डिव्हाइसेस कंपनी ऑफ द ईअर’ हा पुरस्कार मिळाला आहे. फार्मास्युटिकल आणि वैद्यकीय उपकरणांच्या चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या दरम्यान, भारत सरकारच्या फार्मास्युटिकल विभागाच्या वतीने कंपनीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रसायने व खते खात्याचे मंत्री सदानंद गौडा यांच्या हस्ते पॉलिमेडचे व्यवस्थापकीय संचालक हिमांशू बैद यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

५०० कोटी रुपयांहून जास्त उलाढाल करणाऱ्या या कंपनीचे ७० टक्क्यांहून अधिक उत्पन्न १०० हून अधिक देशांना होणाऱ्या निर्यातीद्वारे मिळते. वैद्यकीय आणि डिस्पोजेबल उपकरणांची निर्मिती करणाऱ्या या कंपनीची विविध प्रकारची १२५ उत्पादने आहेत. 

पॉलिमेडचे व्यवस्थापकीय संचालक हिमांशू बैद म्हणाले, ‘आम्ही पॉलिमेडतर्फे स्थानिक वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीच्या प्रोत्साहनासाठी भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’धोरणाचे आभार मानतो. या पुरस्काराने आमच्या प्रयत्नांवर शिक्कामोर्तब केले आहे. उत्कृष्ट संशोधन, नावीन्यपूर्णता आणि दर्जा याद्वारे आम्ही सर्वोत्तम उत्पादने आणि ग्राहकांसाठी उत्तम अनुभव अशा दोन्ही गोष्टी साध्य करतो. या यशामुळे आम्ही आणखी जोमाने काम करून आयुष्मान भारत योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहकार्य करू.’ 

‘आम्ही नव्या उप्त्पादनांच्या सर्वोत्कृष्ट दर्जासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. कंपनीला २१५ पेक्षा अधिक उपकरणांसाठी परवानगी मिळाली असून, जागतिक पातळीवरील पेटंट्स प्राप्त झाली आहेत. २५० हून अधिक पेटंट्ससाठी अर्ज केला आहे,’ असेही बैद यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link