Next
नभोवाणी दिनानिमित्त रिक्षाचालकांचा सन्मान
BOI
Tuesday, February 13, 2018 | 06:02 PM
15 0 0
Share this article:



पुणे :
१३ फेब्रुवारी अर्थात जागतिक नभोवाणी दिनानिमित्त आकाशवाणी पुणे परिवारातर्फे पुणे शहर आणि परिसरातील रिक्षाचालकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. रिक्षाचालक हे केवळ श्रोते नसून, ते शहराचा एक चेहरा आणि ओळख असल्याने या कार्यक्रमाचे आयोजन आकाशवाणी पुणे केंद्राच्या सभागृहात करण्यात आले होते. या वेळी विविध रिक्षा संघटनांच्या रिक्षाचालकांना सन्मानित करण्यात आले. 

आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या भावगीतांनी आमचे जीवन समृद्ध केले आहे, अशा भावना पुरस्कारार्थींनी व्यक्त केल्या. स्मृतिचिन्ह देऊन आनंद बेलामकर, ठकसेन पोरे, इसाक सईद नदाफ, राजेंद्र मांढरे आणि महिला रिक्षाचालक शीला धेंडे आदींचा सत्कार उपमहासंचालक आशिष भटनागर, उपसंचालक गोपाल आवटी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी सर्व रिक्षाचालकांना आकाशवाणी पुणे केंद्राच्या कामकाजाची माहिती देऊन स्टुडिओ दाखविण्यात आले. कार्यकमाचे सूत्रसंचालन मृदुला घोडके यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search