Next
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन कार्यशाळा
BOI
Wednesday, May 29, 2019 | 12:57 PM
15 0 0
Share this article:

कोल्हापूर : दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स (इंडिया) संस्थेचे कोल्हापूर केंद्र व शिवाजी विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग यांच्या वतीने प्रथम वर्ष व थेट दिवितीय वर्ष अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रिया व करिअरबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम रविवारी, दोन जून २०१९ रोजी केशवराव भोसले नाट्यगृह येथे सकाळी साडे नऊ वाजता होणार आहे. 

 शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० करिता अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत प्रवेश पद्धतीने केली जाते. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया अभियांत्रिकी इच्छुक विद्यार्थी व पालक यांना सविस्तर सांगणे हा या कार्यशाळेचा हेतू  आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रियेतील नियम, ऑनलाईन नाव नोंदणी, शाखा निवड पसंती ठरवणे, पसंती क्रम देताना घ्यावयाची काळजी, फी सवलत, आवश्यक कागदपत्रे यांचीही माहिती देण्यात येणार आहे.  अभियांत्रिकीमधील नाविन्यपूर्ण संशोधन, व्यावसायिक ज्ञान व कौशल्य आधारित पदवी अभ्यासक्रम, मेकॅनिकल, सिव्हील, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड टेक्नोलॉजी, फुड टेक्नोलॉजी, केमिकल टेक्नोलॉजी या शाखांचे समन्वयक सखोल माहिती देणार असून, विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.  

बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्र व करिअरसंधी तसेच योग्य करियर निवडीसाठी लागणारी अभिरुची, अभिक्षमता, व्यक्तिमत्त्व व कौशल्य याबाबत तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक प्रा. डॉ. जयदीप बागी व प्राध्यापक मार्गदर्शन करणार आहेत. 

कार्यक्रमाविषयी :
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शन
स्थळ : केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर
दिवस व वेळ : रविवारी, दोन जून २०१९, सकाळी ९.३० वाजता.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search