Next
सुहाना सफर
BOI
Friday, June 21, 2019 | 10:35 AM
15 0 0
Share this article:

भटकंती, पर्यटन हा दैनंदिन जीवनातील विरंगुळा ठरतो. म्हणून अनेक जन दर वर्षी नियमाने फिरायला जातात. धनराज खरटमल यांना कॉलेजजीवनापासूनच फिरण्याची आवड होती. पुढेही ती जपली. या भटकंतीचे वर्णन त्यांनी ‘सुहाना सफर’मधून केले आहे.

यात महाराष्ट्रातील जंजिरा किल्ला, दक्षिणेची कशी हरिहरेश्वर, हिम्मतगड, व्याडेश्वर मंदिर, कुलाबा फोर्ट, माथेरान, आनंद सागर, प्रतीशिर्डी शिरगाव, सातारा जिल्ह्यातील कोंडवली गावातील बारा मोटांच्या विहिरीचे वर्णन केले आहे. पुढे कर्नाटकातील झरणी नृसिंह मंदिर, म्हैसूरमधील चामुंडेश्वरीचे मंदिर, वृंदावन, विजापूरच्या गोल घुमटाचे चित्र शब्दांमधून मांडल्यावर सहल तेलंगणमध्ये पोचते. तेथे हैदराबाद पाहून केरळचे दर्शन होते.

अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय या ईशान्येकडील राज्यांबरोबरच उत्तरेकडील पंजाब, हरियाणा व मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश यांची सैर घडते. भारताचे नंदनवन काश्मीरचाही यात समावेश आहे. राज्यांचे नकाशे, पर्यटनस्थळांची छायाचित्रे आदींमुळे पुस्तक देखणे झाले आहे. 

पुस्तक : सुहाना सफर
लेखक : धनराज खरटमल
प्रकाशक : भाष्य प्रकाशन 
पाने : ३००  
किंमत : १४६ रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search