Next
अवादा पॉवरच्या सामाजिक उपक्रमांचा गौरव
प्रेस रिलीज
Tuesday, March 27, 2018 | 02:54 PM
15 0 0
Share this story

पुणे :  भारतातील अग्रगण्य स्वच्छ उर्जा कंपनी, अवादा पॉवर प्रा. लि., देशभरातील वंचित समुदायांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे.  स्त्रियांमध्ये कौशल्य निर्माण, ग्रामीण विद्युतीकरण, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आरोग्यसेवेचा प्रसार करून महिलांचे सशक्तीकरण करण्याच्या दिशेने कंपनीने अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत. या सातत्यपूर्ण  प्रयत्नांसाठी अवादाला दाद मिळाली असून महिला सक्षमीकरणासाठी ईटी नाऊ सीएसआर लीडरशिप पुरस्कार देऊन तिला सन्मानित करण्यात आले आहे.
 
अवादाने आपल्या कौशल्य विकास कार्यक्रमांद्वारे विशेषतः खेड्यांमधील महिलांना स्थायी उत्पन्न मिळवण्यास सक्षम केले आहे. संपूर्ण भारतात असलेल्या अवादाच्या नवकिरण शिलाई आणि शिवणकला केंद्रात प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालतात.  येथे शिकलेल्या कौशल्यांचा वापर करून प्रशिक्षणार्थी बचत गटांच्या मार्फत नियमित उत्पन्न मिळवित आहेत.  खेड्यांमधील शाळांना शहराच्या बरोबरीने आणण्याच्या आपल्या अभियानांतर्गत अवादाने वर्गखोल्यांवर सौर रूफटॉप प्रणाली बसविल्या आहेत. युवकांना संगणकाची ओळख व्हावी आणि त्यातील संधी मिळाव्यात, यासाठी डिजिटल केंद्रांची सुरूवात करण्यात आली आहे. ग्रामीण शाळांचे पुनर्नवीकरण केले गेले आहे जेणेकरून अधिक उपयुक्त शैक्षणिक वातावरण मिळावे.
 
ऑफ-ग्रिड सौर ऊर्जा प्रकल्पांद्वारे अवादाला लडाख आणि उत्तरप्रदेशातील दूरवरच्या गावांमध्ये वीज पुरविण्यात यश मिळाले आहे. समुदायांमधील चांगल्या आरोग्याची खात्री करण्यासाठी अवादाने ग्रामीण समुदायांना आवश्यक वैद्यकीय मदत मिळविण्यास मदत केली आहे. नियमित आरोग्य शिबिरे आयोजित करण्याव्यतिरिक्त कंपनीने स्वच्छता आणि अन्य प्रतिबंधात्मक उपायांवर लक्ष केंद्रित केले आहे. या विचारांच्या अनुसार कंपनीने ग्रामीण समुदायात घरगुती शौचालयेदेखील बांधली आहेत.
 
अवादा ग्रुपचे अध्यक्ष विनीत मित्तल म्हणाले, ‘आमच्या समावेशक मॉडेलमुळे केवळ कंपनीच्याच नव्हे तर एकूण समाजाच्या विकासाला हातभार लागतो. आमच्या शाश्वतता उपक्रमांद्वारे आम्ही समस्यांचे सर्वांगीण निराकरण करण्याकरिता प्रथम समस्या ओळखून त्यानंतर मोहिमा राबवून व्यापक परिणाम साधू इच्छितो. ग्रामीण भागात  विद्युतीकरण,कौशल्यनिर्मिती, प्रभावी आरोग्यसेवा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांच्याद्वारे  स्थानिक समुदायांमध्ये उत्तम जीवनमानाच्या संधी निर्माण करणे याला आमच्यासाठी आमच्या व्यवसायाइतकेच प्राधान्य आहे. आमच्या सर्व प्रयत्नांबद्दल  ईटी नाऊ लिडरशीप पुरस्काराने सन्मानित होणे, ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. अवादातील आम्हा सर्वांसाठी हा एक अविस्मरणीय क्षण आहे. अवादा पॉवरने नेहमीच समाजाला परत देण्याच्या तत्वज्ञानाचे पालन केले आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अवादा पॉवर शिक्षण, सशक्तीकरणास साह्य करणे, पर्यावरणाचे रक्षण,आरोग्यसेवेचा प्रसार आणि ग्रामीण भारताचे विद्युतीकरण या पाच स्तंभांवर कार्य करते.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link