Next
किरण यज्ञोपवीत यांचे ‘टीटीए’मध्ये व्याख्यान
प्रेस रिलीज
Friday, August 03, 2018 | 11:34 AM
15 0 0
Share this article:

टाइम्स अँड ट्रेंड्स अकादममध्ये मार्गदर्शन करताना मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरील लेखक किरण यज्ञोपवीत

पुणे : टाइम्स अँड ट्रेंड्स अकादमी (टीटीए) या संस्थेमार्फत मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरील लेखक किरण यज्ञोपवीत यांचे व्याख्यान नुकतेच आयोजित करण्यात आले होते.  

यज्ञोपवीत यांनी विविध चित्रपटांमध्ये दिग्‍दर्शक आणि अभिनेता म्‍हणून काम केले आहे. अलीकडेच नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘नटसम्राट’ या मराठी चित्रपटाचे लेखक म्हणून त्यांचे कौतुक झाले होते. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तार्‍यांचे बेट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि अनेक पुरस्‍कार प्राप्त झाले.  प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभलेल्‍या ‘देऊळ बंद’ या चित्रपटासाठी त्‍यांनी लेखक म्‍हणून काम केले.

‘टीटीए’मध्ये किरण यांनी पटकथालेखनावरील सत्र घेतले.  संस्‍थेतील उत्‍साही तरुणांनी सभागृह भरले होते. ‘सलाम’ या किरण यांनी दिग्‍दर्शित चित्रपटाच्या प्रदर्शनाने सत्राची सुरुवात झाली. चित्रपटानंतर त्यांनी प्रेक्षकांना चित्रपटनिर्मितीचे तपशील विशद केले आणि प्रश्नोत्तरांनी सत्राचा समारोप झाला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्‍या असंख्य प्रश्नांचे किरण यांनी सुयोग्‍य स्‍पष्‍टीकरण दिले.

ते म्‍हणाले, ‘चांगला लेखक होण्यासाठी प्रचंड वाचनाची आवश्यकता असते. तुम्‍ही एकदम लिखाण सुरू करू शकत नाही. त्‍यासाठी लिखाणाच्या विविध शैलींचे वाचन करणे आवश्यक असते. एखाद्या लेखकाने काय चुका केल्‍या आहेत हेदेखील समजून घेणे आणि त्‍या चुका कशा टाळायच्या हे शिकणेही आवश्यक असते.’

उद्योगातील आपल्या २० वर्षांच्या अनुभवाचे कथन करतानाच त्‍यांनी नाट्य क्षेत्रातील कारकीर्दीची कशी सुरुवात केली याचीही माहिती या वेळी दिली.

‘टीटीए’चे संस्थापक अध्यक्ष अमित अग्रवाल म्हणाले, ‘टाइम्‍स अँड ट्रेंड्स अकादमीमध्ये चित्रपट आणि दूरचित्रवाणी उद्योगातील किरण यांच्यासारख्या ख्यातनाम व्यक्‍तिमत्‍वाची उपस्‍थिती हे आमचे भाग्‍य आहे.  शिक्षणाच्या विविध रोमांचक संधी प्रदान करणे आणि करिअरचे विविध उपलब्‍ध मार्ग समजून घेण्यास विद्यार्थ्यांची मदत करणे हे आमचे ध्येय आहे. आजचे सत्र आमच्या विद्यार्थ्यांसाठी खूप प्रेरणादायी होते. मी आशा करतो की, किरण यांच्याप्रमाणेच विद्यार्थीही या उद्योगामध्ये नाव कमावल्याशिवाय राहणार नाहीत.’

या सत्राला ‘टीटीए’चा अध्यापन आणि व्यवस्‍थापन वर्ग उपस्‍थित होता.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search