Next
‘एस टर्टल’ची ‘महिंद्रा लॉजिस्टिक्स’शी भागिदारी
प्रेस रिलीज
Monday, October 01, 2018 | 05:31 PM
15 0 0
Share this article:

बेंगळुरू : आशियातील आघाडीची ऑम्नी चॅनेल प्लॅटफर्म कंपनी असलेल्या ‘एस टर्टल’ या कंपनीने महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स (थ्रीपीएल) सोल्यूशन पुरवठादार कंपनीशी भारतातील सर्वाधिक स्केलेबल ऑम्नी- चॅनेल फुलफिलमेंट सोल्यूशनसाठी भागिदारी केली आहे.

‘एस टर्टल’चे ऑनी चॅनेल प्लॅटफॉर्म रूबीकॉन एंटरप्राइज ब्रँड्सना गोदामे आणि रिटेल दालनांसह इतर विविध स्टॉक पॉइंट्सना सर्वोत्तम फुलफिलमेंट विकसित करण्यासाठी मदत करते. ‘महिंद्रा लॉजिस्टिक्स’ विविध क्षेत्रांच्या पुरवठा साखळी व्यवस्थापनासाठी सर्व प्रकारच्या सुविधा पुरवते. आपापल्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या या दोन कंपन्यांतील भागिदारी विविध भौगोलिक प्रदेशांत वापरता येण्याजोगे, तसेच एस टर्टल व महिंद्रा लॉजिस्टिक्स यांना उपयोगी पडू शकणारे असामान्य ऑम्नी चॅनेल फुलफिलमेंट सोल्यूशन उभारले जाणार आहे.

‘एस टर्टल’ने आपल्या प्लॅटफॉर्मद्वारे आतापर्यंत ५० रिटेल ब्रँड्सशी भागिदारी करून त्यांचे विक्री चॅनेल्स व स्टॉक पॉइंट्सचा समावेश स्मार्ट, विनाअडथळा, ऑर्डर, कॅटलॉग, इन्व्हेंटरी व लॉजिस्टिक व्यवस्था यंत्रणा उभी केली आहे. जी त्यांना त्यांच्या ऑम्नीचॅनेल ग्राहकांची कंत्राटे पूर्ण करण्यासाठी मदत करते. ‘एस टर्टल’च्या ऑम्नी चॅनेल फुलफिलमेंट क्षमता ई- कॉमर्स फुलफिलमेंट, दुकाने किंवा गोदामांपासून वाहतूक आणि क्लिक व कलेक्ट अशा प्रकारच्या सेवांसाठी पूरक आहे. ‘एस टर्टल’ने भागिदारी केलेल्या रे-बॅन, प्युमा, बाटा, अरो, फ्लाइंग मशिन, एड हार्डी, यूएस पोलो, फॉसिल या एंटरप्राइज ब्रँड्सचा समावेश आहे.

या भागिदारीविषयी बोलताना ‘एस टर्टल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नितिन छाब्रा म्हणाले, ‘आजच्या ऑम्नी चॅनेल युगात जिथे ग्राहक कोणत्याही वेळेस, कुठूनही खरेदी करत असताना ब्रँड्सना ग्राहकांचा खरेदीचा अनुभव सर्वत्र समान राहाण्यासाठी आवश्यक क्षमता बाळगणे गरजेचे झाले आहे. लॉजिस्टिक्स आणि तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण ग्राहकांसाठी विनाअडथळा, कनेक्टेड ऑम्नीचॅनेल अनुभव देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या साखळी पुरवठा क्षमता आणि आमच्या तंत्रज्ञान क्षमता ऑम्नीचॅनेल अनेबलर म्हणून आमची सक्षम यंत्रणा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. आजच्या बहुआयामी ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेगाने विस्तारण्याची क्षमता असलेले लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स उभारण्याचे समान ध्येय आम्ही ठेवले आहे.’

महिंद्रा लॉजिस्टिक्स आपल्या असेट, लाइट मॉडेलसह सर्वसमावेशक साखळी पुरवठा सोल्यूशन्स पुरवते. ज्यात वाहतूक व वितरण, गोदाम, फॅक्टरीअंतर्गत लॉजिस्टिक्स आणि मूल्यवर्धित सेवा यांचा समावेश असतो. महिंद्रा लॉजिस्टिक्स रिटेल, ई- कॉमर्स, एफएमसीजी, फार्मा व वाहतूक यांसारख्या क्षेत्रांना सेवा देते.

या प्रसंगी महिंद्रा लॉजिस्टिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी पिरोजशॉ सरकारी म्हणाले, ‘सध्याच्या लॉजिस्टिक यंत्रणेचे रूपांतर करण्यात तंत्रज्ञानाने यापूर्वीच महत्त्वाची भूमिका बजावली असून, हे तंत्रज्ञान यापुढेही असेच टिकून राहाणार आहे. ग्राहकांना विविध माध्यमांतून सातत्यपूर्ण अनुभव देण्याची समस्या सोडवणाऱ्या ‘एस टर्टल’बरोबर भागिदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. आमचा ग्राहकाभिमुख दृष्टीकोन आणखी उंचावण्यासाठी आवश्यक असलेल्या सफाईदार व कार्यक्षम तंत्रज्ञानावर आधारित सुविधांसाठी आम्ही त्यांच्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहोत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search