Next
‘पुणे विद्यापीठा’च्या अभ्यासमंडळावर डॉ. मंजुश्री बोबडे यांची नियुक्ती
प्रेस रिलीज
Thursday, August 16, 2018 | 03:59 PM
15 0 0
Share this article:

डॉ. मंजुश्री बोबडे
औंध : रयत शिक्षण संस्थेच्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे यांची ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’च्या अर्थशास्त्र विभागाच्या अभ्यास मंडळावर कुलगुरू नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 डॉ. मंजुश्री बोबडे या गेली दहा वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणून कार्य करीत आहेत. यापूर्वीही त्यांची विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर नियुक्ती झाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्र विषयातून पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. 

त्यांच्या नियुक्तीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे, सहसचिव प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत आणि संस्थेतील इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search