Next
वडगाव शिंदे येथे विविध कामांचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Wednesday, February 20, 2019 | 04:10 PM
15 0 0
Share this article:



पुणे : संसद आदर्श गाव योजना व खासदार निधीअंतर्गत वडगाव शिंदे येथील विविध कामांचे उद्घाटन पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार जगदीश मुळीक, सरपंच विजय शिंदे उपस्थित होते.

या वेळी पुणे शहराकडून खास वडगाव शिंदेसाठी २२ किलो व्हॅटचा स्वतंत्र लाइट जोड प्रकल्प उभारण्यात आला असून, यामुळे गावातील विजेची समस्या कायमस्वरूपी मिटली आहे. या बरोबरच गावातील प्रवाशांसाठी ‘पीएमपीएमएल’चे दोन बसस्टॉपदेखील खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीमधून उभारण्यात आले आहेत.



या बरोबरच सांसद आदर्श गाव योजनेअंतर्गत दहीवान वस्तीचे काँक्रीटीकरण, सुपती वस्तीचे कॉंक्रीटीकरण व त्या ठिकाणी पथदीपांची उभारणी, आझादनगर गावठाण येथे तीन ट्रान्सफॉर्मरची उभारणी आणि व्यायामशाळा यांचे कामदेखील पूर्ण करण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search