Next
औंध महाविद्यालयात शोधनिबंध कार्यशाळा
प्रेस रिलीज
Friday, December 14 | 03:50 PM
15 0 0
Share this story



औंध : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी कृषीमंत्री शरदचंद्र पवार यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त पोस्टर सादरीकरण व शोधनिबंध कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. विज्ञान परिषदेमार्फत पश्चिम विभागातील सर्व शिक्षकांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे पश्चिम विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे, उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, प्रा. एकनाथ झावरे, प्रा. मयुर माळी, डॉ. अतुल चौरे आदी मान्यवर उपस्थित होते.



या प्रसंगी बोलताना रत्नपारखी म्हणाले, ‘शरद पवार यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे कार्य केले आहे. महाराष्ट्रातील सर्वच शिक्षण संस्थांच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. रयत शिक्षण संस्थेचा विस्तार होण्यामागे त्यांनी महत्त्वाची भूमिका आहे. ते २९ वर्षांपासून रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने रयत विज्ञान प्रकल्पाची आणि गुरुकुल प्रकल्पाची सुरुवात झाली. आज हे दोन्ही प्रकल्प चांगल्याप्रकारे सुरू आहेत. रयतसेवक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेने व शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने चांगले कार्य करीत आहेत.’

प्राचार्या डॉ. बोबडे म्हणाल्या, ‘शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेत विज्ञान परिषद आणि स्पर्धा परीक्षेची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे अनेक महाविद्यालयांतील संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्र सादर करण्याची संधी मिळाली. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व विभागातील शिक्षकांचे पोस्टर सादरीकरण व शोधनिबंध कार्यशाळा आयोजित केली आहे. यामुळे अनेक शिक्षकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर शोधनिबंध सादर करण्याची संधी मिळू शकते.’   



या कार्यशाळेत विविध महाविद्यालयांतील शिक्षकांनी सहभाग घेतला होता. यासाठी परीक्षक म्हणून सातारा येथील वाय. सी. कॉलेजचे सर्फराज मुजावर, पिंपरी येथील महात्मा फुले कॉलेजचे शहाजी, बारामती येथील शाहू विद्यालयाचे जी. एम. तावरे म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. संजय नगरकर यांनी केले. प्रा. कुशल पाखले यांनी आभार मानले.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Atul About 34 Days ago
खूप सुंदर बातमी आहे.
1
0

Select Language
Share Link