Next
रयत विज्ञान परिषदेत औंध महाविद्यालयाचे यश
प्रेस रिलीज
Monday, January 07, 2019 | 05:35 PM
15 0 0
Share this storyऔंध : वाशी (नवी मुंबई) येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये झालेल्या राज्यस्तरीय रयत विज्ञान परिषदेत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रद्युम बावणे या विद्यार्थ्याने तयार केलेल्या ‘एमर्जन्सी अॅलर्ट’ या उपकरणाला तृतीय पारितोषिक मिळाले.

सातारा येथील रयत शिक्षण संस्था आणि डॉ. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने चौथी राज्यस्तरीय रयत विज्ञान परिषद वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज येथे २९ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत झाली. यात एकूण साडेतीन हजार विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील सहा विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. यामध्ये प्रद्युम बावणे, प्रशांत गजभरे, सुनीता चव्हाण, दीक्षा कदम, संभाजी साळुंखे, अर्चना शिंदे या विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित विविध उपकरणे बनविली होती. यामधील प्रद्युम बावणे या विद्यार्थ्याने तयार केलेल्या ‘एमर्जन्सी अॅलर्ट’ या उपकरणासाठी तृतीय पारितोषिक मिळाले. त्याला मिळालेल्या पारितोषिकाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे यांनी त्याचे अभिनंदन केले.या प्रसंगी बोलताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. बोबडे म्हणाल्या, ‘लहानांपासून मोठ्यांपर्यंत विज्ञानाची गोडी वाढावी तसेच, विद्यार्थ्यांनी विज्ञानातील नवनवीन शोध लावून मोठे संशोधक व्हावे या उद्देशाने रयत शिक्षण संस्थेने ही ‘रयत विज्ञान परिषद’ भरविली होती.’

या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ,  मार्गदर्शक प्रा. मयुर माळी, आविष्कार कमिटीचे चेअरमन प्रा. कुशल पाखले, रिसर्च कमिटीचे चेअरमन डॉ. संजय नगरकर, डॉ. सुहास निंबाळकर, प्रा. एकनाथ झावरे,  प्रा. सुप्रिया पवार, ‘आयक्यूएसी’ चेअरमन डॉ. सविता पाटील, प्रा. नलिनी पाचर्णे, डॉ. हर्षद जाधव, डॉ. अतुल चौरे उपस्थित होते.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dr.Jayawant Desai About 70 Days ago
Great Congratulations!
0
0

Select Language
Share Link