Next
हिमायतनगरमध्ये संत गाडगेबाबांची जयंती साजरी
नागेश शिंदे
Monday, February 25, 2019 | 02:04 PM
15 0 0
Share this storyहिमायतनगर : संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त २३ फेब्रुवारी २०१९ रोजी शहरातील तरुणांनी परमेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता करत संत गाडगेबाबांचे विचार आत्मसात करून आमचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करू, अशी प्रतिज्ञा घेतली.

या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण शक्करगे यांनी स्वच्छता हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असून, या एका गुणामुळे माणसाचे जीवन सुंदर बनत असल्याचे सांगितले. त्यानंतर संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून परमेश्वर मंदिर सभागृहात जयंती साजरी करण्यात आली.

या वेळी रामभाऊ नरवाडे, प्रकाश रामदिनवार, रामभाऊ सूर्यवंशी, विपुल दंडेवाड, बंडूभाऊ अंनगुलवार, संतोष नरवाडे, गजानन हरडपकर, रमेश गव्हाणे, गजू अनजेतीकर, बालू बिलेवाड, श्रीनिवास पाळजकर यांसह परीट समाजाचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link