Next
‘पाय जमिनीवर ठेवून काम करा; यश तुमचेच’
BOI
Saturday, April 14, 2018 | 03:00 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘व्यवसाय करताना समाजाला न घाबरता प्रामाणिकपणे आणि पाय जमिनीवर ठेवून काम केल्यास यश आपोआप मिळते. त्यासाठी जिद्द, चिकाटीची गरज आहे,’ असे मत जागतिक कीर्तीचे मराठी उद्योगपती आणि दुबईस्थित ‘अल अदिल’ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांनी व्यक्त केले. 

‘मराठी युवा उद्योजक उद्योगिनी सेवाभावी संस्था, महाराष्ट्र’तर्फे पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित ‘खासा २०१८’ या उद्योग प्रदर्शन-विक्री कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. दातार यांच्या हस्ते १३ एप्रिल रोजी झाले. तत्पूर्वी टिळक स्मारक मंदिरात प्रसिद्ध निवेदिका उत्तरा मोने यांनी डॉ. दातार यांची प्रकट मुलाखत घेतली. संघर्षपूर्ण प्रवासातून अनेक अडथळे पार करत व्यवसायात गरुडभरारी घेणाऱ्या आणि मराठी उद्योजकतेचा झेंडा जागतिक पातळीवर फडकावणाऱ्या डॉ. दातार यांची प्रेरणादायी यशोगाथा त्या मुलाखतीतून उलगडली आणि नवउद्योजक व उद्यमशील तरुणाईला उत्तम मार्गदर्शन मिळाले. धनंजय दातार यांनी गेल्या ३३ वर्षांत आपल्या व्यवसायाचा आखाती देशांत प्रचंड जम बसवला. दुबईमध्ये एका छोट्याशा दुकानापासून व्यवसायास सुरुवात करणाऱ्या दातार यांनी आखाती देशांत ३९ सुपर मार्केट्सच्या रिटेल आउटलेट्सची साखळी निर्माण केली. 

‘सध्या प्रत्येक ठिकाणी स्पर्धा सुरू आहे; पण या स्पर्धेत स्वतःला सामावून घेण्यासाठी स्वतःला काय वाटते ते पाहणे गरजेचे असते. जेव्हा एखाद्या व्यवसायात तुम्ही यश मिळवत असता, तेव्हा समाज आपल्यातील वाईट गोष्टींवर चर्चा करत असतो. त्याकडे दुर्लक्ष करा. समाज चर्चा करतो, तेव्हा तुम्ही योग्य रस्त्याने जात आहात याची पावती मिळते,’ असे प्रतिपादन धनंजय दातार यांनी या वेळी केले. 

दरम्यान, डॉ. दातार यांच्या हस्ते उद्घाटन झालेला ‘खासा २०१८’ हा उद्योजकांसाठीचा खास उद्योग प्रदर्शन-विक्री उपक्रम असून, तो रविवार, १५ एप्रिलपर्यंत गणेश कला क्रीडा मंच येथे सुरु राहणार आहे. प्रदर्शनात सागवानी देवघर, पेंटिंग, इमिटेशन ज्वेलरी, हँडमेड ज्वेलरी, सेंद्रिय खाद्यपदार्थ, उत्पादकांनी बनवलेले मसाले, ड्रेस मटेरियल, शर्ट्स, टूर-ट्रॅव्हल्सचे पॅकेजेस, विविध क्षेत्रातील सेवा यांचा समावेश असून, पोटपूजेसाठी खास खाऊगल्लीही आहे. त्यामध्ये उकडीच्या मोदकापासून हैदराबादी बिर्याणीपर्यंत आणि चाटपासून पिझ्झा-बर्गरपर्यंत वैविध्यपूर्ण खाद्य पदार्थांचा आस्वाद घेता येईल.


(डॉ. धनंजय दातार यांच्या मुलाखतीचा काही भाग पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link