Next
सुरेश प्रभू यांची ‘केमेक्सिल’ समारंभाला उपस्थिती
प्रेस रिलीज
Tuesday, April 24 | 04:03 PM
15 0 0
Share this storyमुंबई :
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने स्थापन केलेल्या ‘केमेक्सिल’ने बेसिक केमिकल्स, कॉस्मेटिक्स अँड डाईज एक्स्पोर्ट प्रमोशन काउन्सिल (मुंबई) येथे २०१६-१७ या वर्षासाठी ४६व्या वार्षिक निर्यात पुरस्कार व सर्टिफिकेट ऑफ मेरिटचे आयोजन केले होते. या वार्षिक पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय वाणिज्य व उद्योग व नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू आणि वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्यामल मिश्रा, केमिकल उद्योगातील दिग्गज व उद्योगपती उपस्थित होते.

भारतीय केमिकल निर्यातकांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक करत प्रभू म्हणाले, ‘देशातील केमिकल क्षेत्रामध्ये प्रगती करण्याची प्रचंड क्षमता आहे व निर्यातीची मागणी पूर्ण करण्यासाठी या क्षेत्राने क्षमता विकसित करणे गरजेचे आहे. येत्या काही दिवसांत, केमिकल क्षेत्राच्या निर्यातीला चालना मिळण्यासाठी अनेक उद्योजक सातत्याने प्रयत्न करत असल्याने हे सहजसाध्य आहे. केमिकल क्षेत्र दुपटीहून अधिक वाढण्याची अपेक्षा आहे व सध्याच्या १४७ अब्ज डॉलरवरून २०२५पर्यंत ३०० अब्ज डॉलरपर्यंत वाढेल, असा अंदाज आहे, याची मला कल्पना आहे. सरकारकडून अपेक्षित पुढाकार विचारात घेता, या उद्योगाला देशाच्या निर्यातीत वाढ करण्यासाठी मदत व्हावी म्हणून सरकार अनुकूल वातावरण निर्माण करेल, असे मी आश्वासन देतो.’

उत्तम कामगिरी केलेल्या कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, गोदरेज इंडस्ट्रीज, आरती इंडस्ट्रीज, यूपीएल, इंडो-अमाइन्स, गॅलेक्सी सर्फेक्टंट्स, ज्युबिलिअंट लाइफसायन्सेस, गिरनार व ओरिफ्लेम यांचा समावेश आहे. ‘केमेक्सिल’ने एक्सेल इंडस्ट्रीज लि.चे अश्विन चंपराज व मेघमणी ऑरगॅनिक्स लि.चे जयंत पटेल यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवले. ‘केमेक्सिल’ने ११ त्रिशूळ पुरस्कार, १२ गोल्ड अॅवॉर्ड्स, ११ फर्स्ट व नऊ सेकंड अॅवॉर्ड्स, १९ सर्टिफिकेट ऑफ मेरिट व ११ अॅवॉर्ड ऑफ एक्सलन्सी दिले.  

‘केमेक्सिलचे अध्यक्ष सतीश वाघ यांनी सांगितले, ‘गेल्या तीन वर्षांमध्ये निर्यातीमध्ये साध्य केलेली वाढ व सातत्य आणि २०१६-१७ या वर्षातील निर्यातीची आकडेवारी विचारात घेऊन पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली. निर्यातीसाठी ७३ पुरस्कार व दोन जीवनगैरव पुरस्कार देण्यात आले. सरकारने अवलंबलेल्या आधारदायक धोरणामुळे प्रमुख निर्यातकांना जागतिक बाजारातील आपला हिस्सा वाढवण्यासाठी मदत झाली. भारतात अगोदरच गुणवत्ता, तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा आहेत. २०१६-१७मध्ये, केमेक्सिलने १२.१५ अब्ज डॉलर इतकी निर्यात केली. मूल्य विचारात घेता, अगोदरच्या वर्षातील ११.६८ अब्ज डॉलरच्या तुलनेत निर्यात चर टक्के वाढली.’

जागतिक बाजारातील सध्याची आव्हानात्मक स्थिती विचारात घेता, भारतीय केमिकल निर्यातीने एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीमध्ये अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत १८ टक्के, म्हणजे १२.७८अब्ज डॉलरपर्यंत वाढ साध्य केली. भविष्याच्या दृष्टीने हे सकारात्मक आहे, तसेच हे क्षेत्र सावरत असल्याचे द्योतक आहे. जागतिक केमिकल उद्योगाची उलाढाल अंदाजे ४.३ लाख कोटी डॉलर इतकी आहे. तर, भारतीय केमिकल उद्योगाने २०१५ या वर्षात १४७ अब्ज डॉलर इतकी उलाढाल केली व येत्या पाच वर्षांत त्यामध्ये दर वर्षी अंदाजे नऊ टक्के वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. मूल्याच्या बाबतीत, भारतीय केमिकल उद्योग आशियात तिसऱ्या स्थानी व जगात सहाव्या स्थानी आहे.

भारतातील केमिकल क्षेत्राविषयी :
भारत हा कृषी केमिकल्सचा जगातील तिसरा सर्वात मोठा उत्पादक आहे. गेली पाच वर्षे, देशांतर्गत वापरामुळे स्पेशल्टी केमिकल्स बाजारपेठ १४ टक्के याप्रमाणे वाढत आहे व २०२० पर्यंत ७० अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. जगातील डायस्टफ व डाय इंटरमीडिएट्सपैकी – प्रामुख्याने रिअॅक्टिव्ह अॅसिड व डायरेक्ट डाईज अंदाजे १६ टक्के उत्पादन भारतात केले जाते. भारतातील अॅग्रो-केमिकल्सपैकी अंदाजे ५० टक्के उत्पादनाची निर्यात केली जाते.

केमिकल उद्योग हा भारतातील सुरुवातीच्या काळातल्या देशांतर्गत उद्योगांपैकी एक असून, तो देशाच्या औद्योगिक व आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देत आहे. हा उद्योग सध्या अंदाजे ८० हजार व्यावसायिक उत्पादनांची निर्मिती करते व त्यामध्ये टॉयलेटरीज व कॉस्मेटिक्सपासून प्लास्टिक व कीटकनाशके इथपर्यंत विविध उत्पादनांचा समावेश आहे. या उद्योगामध्ये भारतात अंदाजे दोन दशलक्ष लोक कार्यरत आहेत. हा उद्योग प्रामुख्याने भारतातील पश्चिम व दक्षिण भागात वसलेला आहे, तर जवळजवळ निम्मा उद्योग गुजरातमध्ये एकवटला आहे. उत्पादनाचे अन्य महत्त्वपूर्ण काम महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, मध्य प्रदेश, केरळ व आंध्र प्रदेश येथे चालते.

फीडस्टॉकसाठी शुल्कामध्ये आवश्यक बदल, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि संशोधन व विकास व कौशल्य विकास, तसेच ‘रिव्हर्स एसईझेड’ स्थापन करण्यासाठी नियमनामध्ये शिथिलता व संशोधन व विकास यासाठीच्या गुंतवणुकीवर कर सवलती यामुळे ‘मेक इन इंडिया’ उपक्रम भारतीय केमिकल उद्योगाच्या प्रगतीला चालना देईल, अशी अपेक्षा आहे.

व्यापारामध्ये वाढ करण्यासाठी एफटीपी २०१५-२०च्या मध्य-कालीन आढाव्यामध्ये ‘ट्रस्ट-बेस्ड सेल्फ रॅटिफिकेशन स्कीम’ सादर करण्यात आली आहे. यामुळे, निर्यातीसाठीच्या उत्पादनासाठी, शुल्कातून सवलत देणाऱ्या योजनेंतर्गत सेल्फ-डिक्लेरेशनद्वारे ड्युटी-फ्री इनपुट साध्य करणे शक्य होणार आहे. या योजनेच्या अंतर्गत, निर्यातीसाठीच्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालासाठी नॉर्म्स कमिटीकडून मंजुरी घेण्याऐवजी, निर्यातीसाठीचे उत्पादक, निर्यातक ड्युटी-फ्री कच्चा माल/इनपुट यांचे स्वतःच प्रमाणीकरण करतील व ‘डीजीएफटी’कडून ऑथरायझेशन घेतील.

व्यापाराला चालना देण्याचा भाग म्हणून, अतिशय सक्षम अंतर्गत नियंत्रण व्यवस्था दर्शवलेल्या व सेंट्रल बोररर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम्स यांनी आखून दिलेल्या नियमांचे स्वेच्छेने पालन करण्याची तयारी असलेल्या एंटिटींना फायदा मिळावा, यासाठी सीबायसीने सुधारित एईओ योजनेसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. तसेच, B/E अंतर्गत कागदपत्रे ऑनलान सादर करण्यासाठी सेवा देणाऱ्या ई-संचितमुळे व्यवहाराचा खर्च कमी केला जाईल. सहा एजन्सींमध्ये नऊ अर्ज भरावे लागण्याऐवजी निर्यातक व आयातक यांना एकच सामायिक डिक्लेरेशन देण्याची सोय देणाऱ्या स्विफ्टच्या (सिंगल विंडो इंटरफेस फॉर फॅसिलिटेटिंग ट्रेड) अनुषंगाने ही सुविधा देण्यात आली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link