Next
मिडास ट्रॉफी एकांकिका स्पर्धा उत्साहात
प्रेस रिलीज
Saturday, December 22, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this story

मिडास ट्रॉफी एकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्ट नाटकाचे पारितोषिक स्वीकारताना आकार संस्थेच्या ‘मिराज’ या नाटकाची टीम.

पुणे : तेजल क्रिएशन्स, रिआन व आयजे कॅटॅलिस्टस यांच्या वतीने पुण्यात मिडास ट्रॉफी ही परकीय भाषांमधील एकांकिका स्पर्धा नुकतीच भरतनाट्य मंदिर येथे पार पडली.  यामध्ये विद्यार्थ्यांच्या संघांनी जर्मन, इंग्रजी, स्पॅनिश, पोर्तुगीज, फ्रेंच अशा अनेक भाषांमध्ये विविध एकांकिका सादर केल्या. तब्बल १० एकांकिकांमधून सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले.

या स्पर्धेत आकार संस्थेच्या ‘मिराज’ या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटक (इंग्रजी) पारितोषिक मिळाले. आबासाहेब गरवारे कॉलेजच्या ‘आफ्टर दी डायरी’ (इंग्रजी) नाटकाला द्वितीय आणि ब्लेंडिन लँग्वेज इन्स्टिट्यूटच्या ‘नोसोत्रोस लोस इंडिओज’ (स्पॅनिश) यांना तृतीय पारितोषिक मिळाले. ‘आफ्टर दी डायरी’ या नाटकासाठी सुरज गाडगीळ याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे पारितोषिक मिळाले. सर्वोत्कृष्ट अभिनेता राजेश काटकर (मिराज), सर्वोत्कृष्ट अभिनेता (स्पेशल मेन्शन ज्युरी) राहुल सहस्रबुद्धे (नोसोत्रोस लोस इंडिओज) यांना मिळाले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मृणालिनी प्रतिनिधी (दास एविग वार्टेन, जर्मन), तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (स्पेशल मेन्शन ज्युरी) अधिश्री वाडोडकर (मिराज) यांना देण्यात आले. सर्वोत्कृष्ट लेखक मिलिंद कुलकर्णी (मिराज), द्वितीय क्रमांक ब्लेंडिन लँग्वेज इन्स्टिट्यूट, आणि तृतीय क्रमांक तन्वी कोटकर (दास एविग वार्टेन) यांना देण्यात आले.

याबरोबरच युनिव्हर्सिटी ऑफ गोवाचे फ्रांज स्क्युबर्ट कोटा (पोर्तुगीज) नाटक ‘ऑटो दा इंडिया’ यांना सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट मेक-अपसाठी केदार सोनपत्की (जर्मन), सर्वोत्कृष्ट वेशभूषेसाठी युनिव्हर्सिटी ऑफ गोवाचे लॉरिन अर्ल्बटो (पोर्तुगीज) यांना पारितोषिक देण्यात आले. आबासाहेब गरवारे कॉलेजच्या ‘आफ्टर दी डायरी’ नाटकाला सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना व सर्वोत्कृष्ट सेट ही पारितोषिके मिळाली.

या क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्पर्धेचे परीक्षण केले. त्यामध्ये स्पॅनिशसाठी बेलेन कामानो, पोर्तुगीजसाठी इनेस वेरनर पानसे, इंग्रजीसाठी आश्‍विनी गोवारीकर, फ्रेंचसाठी सुनील गानू, जर्मनसाठी श्रीकांत पाठक, नाटकांसाठी गिरीश जोशी व भाग्यश्री देसाई यांचा समावेश होता.

या प्रसंगी या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल माधुरी दातार यांना इंडस्ट्री पायोनियर अ‍ॅवॉर्ड, ज्येष्ठ जपानी शिक्षक डॉ. हरी दामले यांना इन्सपायरिंग टीचर अ‍ॅवॉर्ड ने गौरविण्यात आले. या वेळी बीआयटीएस प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संदीप नूलकर, ई-झेस्टमधील चीफ इव्हँजलिस्ट गिरीशचंद्र देशपांडे आणि क्रेडीट सेफ जपानचे मुख्य कामकाज अधिकारी राहुल बापट हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

‘मिडास ट्रॉफी ही तेजल क्रिएशन्सच्या ललिता मराठे यांची मूळ कल्पना असून, ना नफा तत्त्वावर चालणारी ही स्पर्धा आहे. इंग्रजी व परकीय भाषा शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आपले कौशल्य सादर करण्यासाठी व भाषाकौशल्य विकसित करण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे,’ असे एफटीबी आणि विझीटेक सोल्युशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद शिराळकर यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link