Next
रणजित देसाई
BOI
Sunday, April 08, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

श्रीमान योगी, स्वामी, पावनखिंड यांसारख्या सरस ऐतिहासिक कादंबऱ्यांमुळे जनमानसांत प्रेमादराचं स्थान मिळवलेले लेखक रणजित देसाई यांचा आठ एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.....
आठ एप्रिल १९२८ रोजी कोवाडमध्ये (जि. कोल्हापूर) जन्मलेले रणजित देसाई हे अत्यंत आकर्षक भाषेत इतिहास जिवंत करणारे लेखक म्हणून ओळखले जातात. 

एकीकडे शिवाजीराजे, माधवराव पेशवे, बाजीप्रभू देशपांडे, रामशास्त्री प्रभुणे यांच्यासारख्या उत्तुंग ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांवर लेखन करत असतानाच देसाई यांनी कर्ण आणि राजा रविवर्मासारखी व्यक्तिमत्त्वंसुद्धा आपल्या लेखणीतून जिवंत केली. त्यांच्या या सर्वच साहित्यकृती मराठी साहित्यविश्वात मानाचं स्थान मिळवून आहेत. श्रीमान योगी, स्वामी यांसारख्या कादंबऱ्या तर वर्षांनुवर्षं बेस्ट सेलर्स ठरल्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांचे विविध भारतीय भाषांत अनुवाद झाले आहेत.

अभोगी, पावनखिंड, प्रतीक्षा, बारी, माझा गांव, राजा रविवर्मा, राधेय, समिधा, स्वामी यांसारख्या त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या आहेत.

आषाढ, आलेख, कणव, कातळ, कालवा, गंधाली, जल, प्रपात, बाबुल मोरा, मधुमती, मेखमोगरी, रूपमहाल, स्नेहधारा यांसारखे त्यांचे लघुकथासंग्रह प्रसिद्ध आहेत. 

गरुडझेप, तुझी वाट वेगळी, कांचनमृग, धन अपुरे, पंख जाहले वैरी, पांगुळगाडा, रामशास्त्री, लोकनायक, वारसा, सावली उन्हाची, स्वामी आणि हे बंध रेशमाचे यांसारखी नाटकं त्यांनी लिहिली आहेत. कोल्हापूरमध्ये भरलेल्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

त्यांना पद्मश्री, तसंच जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. स्वामी कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, हरी नारायण आपटे पुरस्कार, तसंच महाराष्ट्र राज्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. 

सहा मार्च १९९२ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(रणजित देसाई यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link