Next
नाशिकचे वाकचौरे, पुण्याचे डॉ. हरपळे यांचे फ्रान्समधील खडतर सायकल स्पर्धेत यश
१२०० किलोमीटरची पीबीपी स्पर्धा निर्धारित ९० तासांच्या आत पूर्ण
BOI
Thursday, August 29, 2019 | 05:22 PM
15 0 0
Share this article:

बाळासाहेब वाकचौरेनाशिक/पुणे : नाशिकचे प्रशासकीय अधिकारी आणि सायकलिस्ट बाळासाहेब वाकचौरे, तसेच पुण्यातील डॉ. चंद्रकांत हरपळे यांनी फ्रान्समधील ‘पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस’ (पीबीपी) ही अतिशय खडतर अशी १२०० किलोमीटरची सायकल स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. ७० देशांचे सायकलिस्ट सहभागी झालेल्या या स्पर्धेत या दोघांनी भारताचा तिरंगा फडकवला आहे.

पॅरिस ते ब्रेस्ट ते पुन्हा पॅरिस अशा १२१५ किलोमीटर अंतरावर ही स्पर्धा घेतली जाते. ही रूढार्थाने शर्यत नसते; पण दिलेल्या वेळात हे अंतर पूर्ण करण्यावर यश अवलंबून असते. यंदाची स्पर्धा १८ ते २२ ऑगस्ट या कालावधीत झाली. ९० तासांचा वेळ हे अंतर पार करण्यासाठी दिलेला होता; वाकचौरे यांनी हे अंतर ८७ तास ४२ मिनिटे ३३ सेकंदांत यशस्वीरित्या पार केले. डॉ. हरपळे यांनी ८९ तास ३८ मिनिटे आणि १२ सेकंदांमध्ये हे अंतर पूर्ण केले.

डॉ. चंद्रकांत हरपळेही स्पर्धा अतिशय कठीण समजली जाते. कारण या स्पर्धेदरम्यान डोंगर-दऱ्या, नद्या, चढ-उतार अशा विविध ठिकाणांतून प्रवास करावा लागतो. थंडी, ऊन, पाऊस या सर्वांचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी भरपूर ऊन असते, तर काही ठिकाणी धो-धो पाऊस असतो. अशा परिस्थितीतही बाळासाहेब वाकचौरे, तसेच चंद्रकांत हरपळे यांनी यश मिळवले आहे. या स्पर्धेत सायकल चालवत असताना रस्त्यात कोणताही आधार मिळत नाही. सायकल पंक्चर झाल्यास स्वतः सायकलीचे पंक्चर काढून मार्गक्रमण करावे लागते.

नाशिकमधून या सायकल स्पर्धेसाठी तीन स्पर्धक गेले होते. त्यात एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश होता. भारतातून अन्य काही स्पर्धकही यात सहभागी झाले होते. नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सायकलिस्ट वाकचौरे यांचे अभिनंदन केले. नाशिकला आल्यावर वाकचौरे यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. डॉ. मनीषा रौंदळ, डॉ. आबा पाटील, अर्चना केकान, अविनाश येवलेकर, किशोर काळे यांनीही वाकचौरे यांचे अभिनंदन केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
SURESH DANDE About 22 Days ago
ABHINANDAN
0
0

Select Language
Share Link
 
Search