Next
‘कविता रसिक मंडळी’तर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन
BOI
Thursday, February 28, 2019 | 04:30 PM
15 0 0
Share this story

आचार्य रतनलाल सोनग्रापुणे : कविता रसिक मंडळी आणि आर. के. सोनग्रा फाउंडेशन यांच्या वतीने रविवारी, तीन मार्च २०१९ रोजी ‘मंदिरात स्त्री-एक आदिम लढा’ या विषयावरील संवाद आणि कवितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात सायंकाळी पाच ते आठ या वेळेत हा कार्यक्रम होणार असून, दहा कवींच्या कविता सादर होतील. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य रतनलाल सोनग्रा असतील. भूषण कटककर, स्वाती सामक, सुप्रिया जाधव, वर्षा कुलकर्णी, वासंती ब्रम्हे आणि सुनीती लिमये यांची विशेष उपस्थिती असेल. या वेळी वंदना लोखंडे, नचिकेत जोशी आणि डॉ. माधुरी चव्हाण यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे;तसेच पुरोगामित्वाशी बांधिलकी जपणाऱ्या पंधरा नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. शीतल चव्हाण यांची मुलाखत घेण्यात येणार आहे. कवी संमेलनात प्रमोद खराडे, शर्वरी मुनीश्वर, चंचल काळे, वासंती वैद्य, वंदना लोखंडे, दीपाली आव्हाळे, वर्षा हळबे, स्मृता साळुंके, वर्षा तोडमल, मिलिंद छत्रे व श्रद्धा देशपांडे सहभागी होणार आहेत. 

कार्यक्रमाविषयी 
कवितावाचन व संवाद 
स्थळ : माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद
दिवस व वेळ : रविवार, तीन मार्च, सायंकाळी पाच ते आठ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link