Next
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यशाळा
प्रेस रिलीज
Wednesday, October 17, 2018 | 01:54 PM
15 0 0
Share this article:

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे ‘औषधी वनस्पती लागवड व प्रक्रिया’ या विषयावर कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यात २७ जणांना प्रशिक्षण देण्यात आले.

कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. के. एन. धुमाळ यांच्या हस्ते झाले. डॉ. धुमाळ यांनी सेंद्रीय पद्धतीने औषधी वनस्पतींची लागवड या विषयावर मार्गदर्शन केले. उद्घाटन कार्यक्रमाला मनकर्णिका औषधालयाचे गिरीश गांधी, प्रशिक्षण कार्यशाळेचे समन्वयक डॉ. दिगंबर मोकाट, महाराष्ट्र उद्योजकता केंद्राचे प्रमुख सुरेश उमप, रेखा पवार व मिलिंद लोंढे उपस्थित होते.

या वेळी औषधी वनस्पतींची ओळख, लागवडीचे तंत्र, दुर्मिळ वनौषधी लागवड-संवर्धन, बागेची उभारणी, रोपवाटिका उभारणी व तंत्र, आदी मुद्द्यांवर प्रशिक्षण देण्यात आले. डॉ. जयंत अभ्यंकर, डॉ. गिरीश टिल्लू, डॉ. सचिन आरू यांनीही या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. नूतन मालपाठक यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रशस्तिपत्रके प्रदान करण्यात आली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search