Next
‘सवाई’त बहरले पंजाबमधील शास्त्रीय संगीताचे सूर
BOI
Friday, December 14, 2018 | 08:18 PM
15 0 0
Share this article:

रागी बलवंत सिंग नामधारी

पुणे  : सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा तिसरा दिवस रागी बलवंत सिंग नामधारी यांनी सादर केलेल्या पंजाबमधील शास्त्रीय संगीत परंपरेच्या आविष्काराने रंगला. पहिल्या सत्रात अपर्णा पणशीकर यांच्या सुश्राव्य गायनानंतर रागी बलवंत सिंग नामधारी यांनी सादर केलेल्या पारंपरिक पंजाबी शास्त्रीय संगीतातील रचनांच्या दमदार सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली. 
 
अपर्णा पणशीकर

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरुवात अपर्णा पणशीकर यांच्या सुश्राव्य गायनाने झाली. त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग लाजवंतीने केली. त्यांनी त्यांच्या आई व गुरू मीरा पणशीकर यांनी गायलेले ‘छोड मत जैयो जी’ हे मीरेचे भजनही गायले. त्यांना पं. रामदास पळसुले (तबला), लीलाधर चक्रदेव (हार्मोनियम), आसाराम साबळे (पखावज), शिवाजी डाके (टाळ), आदिती साठे व माधवी घुमटकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली.


त्यांच्यानंतर बलवंत सिंग नामधारी यांनी पंजाबमधील शास्त्रीय संगीताच्या परंपरेतील काही बंदिशी आणि पंजाबी कीर्तन परंपरा असलेल्या शबद कीर्तन रचनाही सादर केल्या. जयपूर आणि तलवंडी घराण्याच्या काही बंदिशी त्यांनी सादर केल्या. ‘चिरंजीवी रहो दोनो’, ‘जगत जननी जगदंबे भवानी’, ‘बरस रही कारी कारी बदरिया’ या रचना त्यांनी सादर केल्या. त्यांच्या कसलेल्या सादरीकरणास श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यांना हरप्रीत सिंग (तबला), ठाकुर सिंग (हार्मोनियम), इशर सिंग (इसराज), ग्यान सिंग (पखावज जोडी), विनय चित्राव (तानपुरा) यांनी साथसंगत केली.


(रागी बलवंत सिंग नामधारी यांच्या गायनाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


(अपर्णा पणशीकर यांच्या गायनाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search