Next
मानुषी छिल्लरला व्हायचंय हृदयरोग तज्ज्ञ
बॉलीवूडमध्ये नाही, तर वैद्यकीय क्षेत्रात करायचे आहे करिअर
BOI
Thursday, March 14, 2019 | 06:12 PM
15 0 0
Share this article:

मानुषी छिल्लरमुंबई : २०१७चा ‘मिस वर्ल्ड’ हा किताब मिळवणारी भारतीय मानुषी छिल्लर ही आता बॉलीवूडमध्ये येणार अशा चर्चा रंगलेल्या असतानाच, खुद्द मानुषीने मात्र या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. आपल्याला बॉलीवूडमध्ये नाही, तर वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे असल्याचे तिने नुकतेच एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे. 

मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स, मिस इंडिया यांपैकी कोणताही किताब मिळवलेली मुलगी पुढे चित्रपट क्षेत्रातच येते, असा जणू पायंडाच आजवर पडलेला आपल्याकडे दिसतो. यातल्या कित्येकींनी बॉलीवूडचीच वाट धरली आहे. या धर्तीवर आता मानुषीही चित्रपटात येणार याबाबत चर्चा रंगल्या होत्या. इतकेच नाही, तर दिग्दर्शक करण जोहर आणि फराह खान यांनी तिला लॉन्च करण्यासाठीची तयारीही सुरू केली होती. परंतु नुकत्याच एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मानुषीने आपली बाजू स्पष्ट केली आहे. 

मानुषी सध्या वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत असून पुढे जाऊन तिला हृदयरोग तज्ज्ञ व्हायचे आहे, असे तिने या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. मुळची हरियाणाची असलेल्या मानुषीने २०१७चा ‘मिस वर्ल्ड’चा किताब आपल्या नावे केला होता. हा किताब मिळवणारी ती सहावी भारतीय मुलगी आहे. ‘फेमिना मिस इंडिया’ हा किताब मिळवून ती हरियाणातून राष्ट्रीय पातळीवर आली आणि त्यानंतर तिने ‘मिस वर्ल्ड’चा किताब मिळवला. ‘फेमिना मिस इंडिया’ची अंतिम विजेती हा किताब मिळवून ‘मिस वर्ल्ड’ बनलेली ती पहिली भारतीय आहे. 

‘बॉलीवूडमध्ये येण्याचे माझे स्वप्न कधीच नव्हते. मी नेहमीच एक गुणी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले आहे. ‘मिस वर्ल्ड’सारखा मानाचा किताब मिळवल्यानंतर माझ्यावरील जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. अशा कित्येक जणी आहेत, ज्यांनी ‘मिस वर्ल्ड’, ‘मिस युनिव्हर्स’चे किताब मिळवून आपले शिक्षणही सांभाळले आहे. आता काही काळ या सगळ्यातून ब्रेक घेत अभ्यासावर लक्ष देण्याचे मी ठरवले आहे. अर्थात ‘मिस वर्ल्ड’ संस्थेच्या माध्यमातून करण्यासारखे काही काम असेल, तर ते करायला मला नेहमीच आवडेल’, असे मत मानुषीने या मुलाखतीतून व्यक्त केले आहे.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search