Next
राहुल सांकृत्यायन
BOI
Monday, April 09, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

भारतभर नव्हे तर जपान, रशिया, तिबेट, श्रीलंका, इराण सारख्या विविध देशांमध्ये भ्रमंती करत, आपल्या ४५ वर्षांच्या भ्रमंतीवर आधारित प्रवासवर्णनं लिहून गाजलेले महापंडित आणि तत्त्वज्ञ राहुल सांकृत्यायन यांचा नऊ एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.......
नऊ एप्रिल १८९३ रोजी आझमगढमध्ये जन्मलेले केदारनाथ पांडे ऊर्फ राहुल सांकृत्यायन हे महापंडित होते. त्यांना अनेक भाषा अवगत होत्या, तसंच अनेक विषयांचं सखोल ज्ञान होतं. त्यांनी भारतभरच नव्हे तर नेपाळ, तिबेट, श्रीलंका, इराण, जपान, रशिया अशा विविध देशांचा प्रवास केला आणि आपल्या ४५ वर्षांच्या प्रवासावर आधारित हिंदीमध्ये प्रवासवर्णनं लिहिली आणि ती अत्यंत लोकप्रिय झाली.

बौद्ध तत्त्वज्ञान, तिबेटच्या साधूंचं तत्त्वज्ञान, विज्ञान, आशियाई संस्कृती, लोकसंस्कृती, समाजशास्त्र अशा विषयांवर त्यांनी पुष्कळ लिखाण केलं. त्यासाठी हिमालयात भ्रमंती करून डोंगरदऱ्या, खेडी, गावं, शहरं-नगरं पालथी घालून दुर्मीळ पुस्तकं गोळा केली. अक्षरशः खेचरांच्या पाठीवर लादून त्यांनी अनेक दुर्मीळ ग्रंथ भारतात आणले होते. बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी त्यांनी तिबेटपासून श्रीलंकेपर्यंत प्रचंड प्रवास केला होता. सुरुवातीला बौद्ध धर्माचा स्वीकार करून ते बौद्ध भिख्खू बनले होते; पण पुढे त्यांनी मार्क्सवादाचा अंगीकार केला.

बाईसवी सदी, जीनेके लिये, भागो नही, दुनिया को बदलो, मधुर स्वप्न, विस्मृत यात्री अशा त्यांच्या एकूण दहा हिंदी कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. त्याशिवाय सरदार पृथ्वी सिंग, स्टॅलिन, कार्ल मार्क्स, माओ-त्से-तुंग, कप्तान लाल, महामानव बुद्ध अशी १६ चरित्रं त्यांनी लिहिली. याशिवाय भोजपुरी, नेपाली, तिबेटन अशा भाषांमध्येही त्यांनी लेखन केलं आहे. त्यांना १९५८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.

भारत सरकारने १९६३ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं.  १४ एप्रिल १९६३ रोजी त्यांचं दार्जिलिंगमध्ये निधन झालं.

(राहुल सांकृत्यायन यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link