Next
‘आयबेटीस’तर्फे डोळे, मधुमेह तपासणी शिबिर
भारतीय क्रिकेटर सुनील गावस्कर यांची शिबिराला भेट
BOI
Friday, September 21, 2018 | 01:01 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : गणेशोत्सवाचे औचित्य साधून नेत्रविकार तज्ज्ञ डॉ. निशांत कुमार यांच्या आयबेटीस फाउंडेशनतर्फे प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात ११ दिवस गणेशभक्तांसाठी मोफत डोळे व मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात आतापर्यंत तब्बल चार हजार भाविकांची तपासणी करण्यात आली असून, एकाच दिवसात दोन हजार भाविकांनी तपासणी करून घेतली. प्रख्यात भारतीय क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी या शिबिराला भेट देऊन डॉ. कुमार आणि आयबेटीस फाउंडेशन घेत असलेल्या परिश्रमाबाबत त्यांचे विशेष कौतुक केले.

आयबेटीस फाउंडेशनचे नेत्रविकार तज्ज्ञ डॉ. कुमार म्हणाले, ‘बरेचदा असे दिसून येते की लोक नियमित आरोग्य तपासणी करत नाहीत, त्यामुळे काही त्रास जाणवायला सुरुवात झाल्यावरच डॉक्टरांकडे जातात व त्यावेळी मधुमेह, डोळ्यांना मोतीबिंदूची लागण किंवा इतर आजारांची सुरुवात असल्याची अनेक उदाहरणे समोर येतात. तासनतास बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांना रांगेत उभे राहावे लागते. या वेळी तपासणी शिबिर आयोजित केले, तर भाविकांना बाप्पाच्या दर्शनासह आरोग्य तपासणीही करता येईल व त्यासाठी वेगळा वेळ देण्याचीही आवश्यकता नाही. म्हणून आम्ही गणेशोत्वासदरम्यान आरोग्य शिबिर आयोजित करून त्यात रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण, दृष्टीदोष आदी तपासणी करण्याचे ठरविले; तसेच विविध तपासणी करून आलेले रिपोर्ट्स त्यांच्या मोबाइल फोन, ई-मेलवर पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिले. हे आरोग्य शिबिर अनंत चतुर्दशीपर्यंत सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत सुरू राहील.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search