Next
‘डॉमिनोज’तर्फे भारतीय सैनिकांबरोबर प्रजासत्ताक दिन साजरा
प्रेस रिलीज
Thursday, January 31, 2019 | 04:24 PM
15 0 0
Share this storyनोएडा : आपल्या देशाच्या रक्षणात भारतीय सैन्यदलातील सैनिकांनी केलेल्या त्यागाची आणि मेहनतीची दखल घेत यंदाचा प्रजासत्ताक दिन ‘डॉमिनोज पिझ्झा’तर्फे सियाचिन ग्लेशियर येथील भारतीय सैनिकांसोबत साजरा करण्यात आला. या निमित्ताने, समुद्रसपाटीपासून २० हजार फुटांवर राहणाऱ्या सैनिकांमध्ये ‘डॉमिनोज’ने चार हजार पिझ्झांचे वाटप केले. आपले सैनिक आपल्या कुटुंबियांपासून दूर असतानाही त्यांना काही आनंदाचे क्षण घालवता यावेत, हा या उपक्रमामागचा हेतू होता.

अतिशय कठीण, सहन न होण्याजोग्या वातावरणात राहून आपल्या देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांप्रति स्नेहभाव आणि कृतज्ञता व्यक्त करता आली, याबद्दल डॉमिनोज पिझ्झा टीमने धन्यता व्यक्त केली.या विषयी बोलताना ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडचे पूर्णवेळ संचालक आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रतिक पोटा म्हणाले, ‘जगातल्या सर्वात उंच मिलिटरी बेसवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांना गरमागरम डॉमिनोज पिझ्झा खायला घालण्याची आम्हाला संधी मिळाली हा आमचा बहुमानच आहे. अत्यंत कठीण हवामानाचा सामना करत कणखरपणे आपल्या देशाच्या सीमांवर उभे ठाकून आपल्याला सुरक्षित ठेवणाऱ्या या सैनिकांसोबत आनंद साजरा करताना आम्हाला फार धन्य वाटले. सैनिकांच्या निस्वार्थी सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘डॉमिनोज’च्या टीमने सियाचिन बेस कॅम्प येथे जाऊन, तिथेच पिझ्झा बनवून गरमागरम पिझ्झा सैनिकांना खाऊ घातले. आपल्या सैन्यदलांची सेवा करण्याच्या अशाच आणखी संधीही आम्हाला मिळतील, अशी आशा आम्हाला वाटते.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link