Next
शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी ‘स्वर सन्निध’ संस्थेची स्थापना
आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन
BOI
Wednesday, April 10, 2019 | 02:33 PM
15 0 0
Share this article:

मीनल दातार यांनी शास्त्रीय गायन सादर केले. त्यांना हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर आणि  तबल्यावर निषाद पवार यांनी साथसंगत केली.

पुणे : भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी आणि शास्त्रीय संगीत कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘स्वर सन्निध’ संस्थेचे पिंपरी-चिंचवड पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ढेपे वाडा येथे शास्त्रीय संगीताच्या मैफलीने या संस्थेचा औपचारिक प्रारंभ झाला. प्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळीक, गायिका अर्चना कान्हेरे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

संस्थेच्या संस्थापक मीनल दातार (शास्त्रीय गायन), निखिल पटवर्धन (सतार वादन) यांनी ही उद्घाटनाची मैफल रंगवली. हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर, तबल्यावर निषाद पवार यांनी साथसंगत केली. निखिल पटवर्धन यांनी सतारीवर जौनपुरी राग सादर करून रसिकांची मने जिंकली. मीनल दातार यांनी अल्हैया बिलावल रागातील ‘ दैय्या कहा गये’ या बडा ख्यालाबरोबर ‘कवन बतरीया गईलो’ ही मध्य लयीतील अप्रतिम बंदीश त्यांनी सादर केली. शेवटी ‘जा रे, जा रे’ ही द्रूत लयीतील बंदीश आणि ‘का धरिला परदेस’ हे नाट्यपद आणि ‘अवघा रंग एक झाला’ हा अभंग दातार यांनी सादर केला.


‘भारतीय शास्त्रीय संगीत सर्वांपर्यंत, सर्व माध्यमातून पोहोचविणे हेच ‘स्वर सन्निध’ संस्थेचे ध्येय असून, संस्था या ध्येययपूर्तीसाठी कार्यरत राहील,’ असे मीनल दातार यांनी या वेळी सांगितले. श्रावण हर्डीकर यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search