Next
‘गोडॅडी’ ‘क्लाउडफेस्ट’चे सलग सहाव्या वर्षी प्रमुख प्रायोजक
प्रेस रिलीज
Tuesday, May 22, 2018 | 04:23 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : गोडॅडी आयएनसी या लघु व स्वतंत्र व्हेंचर्सना वाहिलेल्या जगातील सर्वांत मोठ्या क्लाउड आधारित व्यासपीठाने आगामी क्लाउडफेस्ट परिषदेसाठी आपले प्रायोजकत्व आज (ता. २२) जाहीर केले. ही सर्वांत मोठी डोमेन नेम परिषद मुंबईत २३ मे २०१८ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

भारतातील वेब प्रोफेशनल्स आणि स्थानिक रिसेलर्सच्या व्यापारवृद्धीप्रती असलेली आपली प्रतिबद्धता पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी ‘गोडॅडी’ने हे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. या माध्यमातून, व्यावसायिकांना ऑनलाइन टूल्स, व्यासपीठ आणि व्यापार नियोजनासाठी सोल्यूशन्स पुरवण्यात येणार आहेत.

‘गोडॅडी’ व्यासपीठावरील नेतेमंडळींची दोन सत्रे या इव्हेंटमध्ये होणार आहेत. यात वरिष्ठ उत्पादन अधिकारी स्टिव्हन अल्ड्रिच आणि ‘गोडॅडी’चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक निखिल अरोरा यांचा समावेश असणार आहे. जागतिक रोजगार निर्मितीत स्वतंत्र भागीदार्‍यांचा कसा वाटा असतो आणि त्यांच्या ऑनलाइन अस्तित्वात ‘गोडॅडी’चा हातभार किती आहे, याबाबत स्टिव्हन माहिती देणार आहेत. त्यानंतर, निखिल यांच्या ‘फॉल इन लव्ह वुइथ यूवर कस्टमर्स प्रॉब्लेम’ या ज्ञानसत्रात ‘गोडॅडी’च्या ग्राहकांशी चर्चा केली जाणार आहे.

‘गोडॅडी’चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरोरा म्हणाले, ‘क्लाउडफेस्टशी आम्ही भागीदारी केली असून ‘गोडॅडी’साठी ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. या भागीदारीमुळे भारतातील आमच्या भागीदार समुहाशी अधिक घट्ट नाते जुळवण्यास आम्हाला मदत होते आहे. स्वतंत्र व्यावसायिक, लघु उद्योजक, मालक यांना आपापल्या ऑनलाइन भागीदार्‍या विकसित करण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत करणार्‍या सर्व उपस्थितांसह आमची नवीन उत्पादने व व्यासपीठातील सुधारणा मांडण्यासाठी ही योग्य संधी आहे. एकत्रित उपक्रम व मोहिमांच्या माध्यमातून द्वितीय श्रेणीतील शहरांमध्ये आमचा व्यापार वाढवण्याची आमची इच्छा असल्यामुळे आमच्या भागीदारांसह जास्तीत जास्त सक्षमपणे काम करता येईल, त्यांना भेटता येईल, अशी आम्हाला आशा आहे. परिणामी, देशातील वाढत्या इंटरनेट परिसंस्थेलाही पाठिंबा देता येईल.’

या परिषदेत ‘गोडॅडी’तर्फे व्हर्च्युअल प्रायव्हेट सर्व्हिस उत्पादन सादर केले जाणार असून, हे जलद, व्यापक आणि सुरक्षित होस्टिंग सोल्यूशन आहे. झपाट्याने वाढत चाललेल्या वेब अ‍ॅप्लिकेशन्ससाठी हे परफेक्ट उत्पादन ठरणार आहे. व्हीपीएसमुळे वेब प्रोफेशनल्सना आपल्या होस्टिंग सोल्यूशन्सवर अधिक चांगल्या पद्धतीने ताबा मिळवता येणार असून, कमी वेळात ऑनलाइन होण्यास व ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा पुरवण्यास मदत होणार आहे.

‘गोडॅडी’तर्फे या वेळी उत्पादनांचे प्रदर्शन मांडलेला बूथ स्थापन करण्यात येत असून, व्यासपीठाच्या कल्पक टूल्स व सेवांबाबत ग्राहक व भागीदारांना माहिती देण्यासाठी तज्ज्ञांतर्फे प्रात्यक्षिकेही करून दाखवली जाणार आहेत. ‘गोडॅडी’च्या सध्याच्या भागीदार व्यासपीठांमध्ये (प्रोफेशनल्स व रिसेलर्स व्यासपीठ) घातलेली भरही या वेळी जाहीर करण्यात येणार असून, यामुळे क्लाएंट्सशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधण्यास मदत होणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search