Next
स्टार्टअप करणारच मी, उद्योजक होणारच मी
BOI
Friday, March 29, 2019 | 10:27 AM
15 0 0
Share this article:

हल्ली ‘स्टार्टअप’ हा जणू परवलीचा शब्द बनला आहे; पण स्टार्टअप म्हणजे नेमके काय, कोण व कशा प्रकारे स्टार्टअप सुरू करू शकतो, हे डॉ. विठ्ठल इंदिरा व्यकंटेश कामत यांनी ‘स्टार्टअप करणारच मी, उद्योजक होणारच मी’ या पुस्तकामधून सर्वसामान्यांसमोर सोप्या भाषेत मांडले आहे. १२ वर्षांच्या विद्यार्थ्यांपासून ते ८२ वर्षांच्या ज्येष्ठ विद्यार्थी वाचक गटापर्यंत सर्वांसाठी हे पुस्तक असल्याचे लेखकाने यात नमूद केले आहे. त्यानुसार लेखनाची भाषाशैलीही दिलखुलास आहे. विठ्ठल कामत स्वतः उद्योजक कसे झाले, हे उलगडतानाच स्टार्टअप करताना स्वतःचे मूल्यमापन, आत्मपरीक्षण कसे करायचे, याचे मार्गदर्शन त्यांनी केले आहे. संतुलित विचारशक्ती, प्रबळ मनःशक्ती आणि दूरदृष्टी हा पाया धरून त्याला व्यावहारिकतेची जोड दिल्यास आपण आयुष्यात यशस्वी उद्योजक होणारच, हा मूलमंत्र त्यांनी दिला आहे. स्टार्टअप करताना बदलाचा स्वेच्छेने स्वीकार करणे, स्टार्टअपपूर्वीची तयारी, स्टार्टअप आणि उद्योगातील फरक, श्रद्धा, आत्मविश्वास बाळगणे, स्टार्टअप सुरू झाल्यावर त्याचे उद्योगात रूपांतर करण्यासाठीची तयारी व त्यानंतर यशस्वी उद्योजकासाठीचे तंत्र या पुस्तकातून त्यांनी समजावून सांगितले आहे. 

पुस्तक : स्टार्टअप करणारच मी, उद्योजक होणारच मी
लेखक : डॉ. विठ्ठल इंदिरा व्यंकटेश कामत
प्रकाशक : मायमिरर पब्लिशिंग हाउस
पृष्ठे : २७२
मूल्य : ३५० रुपये

(‘स्टार्टअप करणारच मी, उद्योजक होणारच मी’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search