Next
... आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही चित्रपट
फडणवीस यांच्या हस्ते चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण; विवेक ओबेरॉय दिसणार मोदींच्या भूमिकेत
BOI
Tuesday, January 08, 2019 | 02:53 PM
15 0 0
Share this story


मुंबई : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर आधारित असलेल्या ‘अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यातच आता विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही चित्रपट येतो आहे. गेली काही वर्षे बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून लांब राहिलेला अभिनेता विवेक ओबेरॉय या चित्रपटाच्या माध्यमातून दमदार पुनरागमनाच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी यांच्या तरुणपणीची भूमिका विवेक साकारणार आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’  असे नाव असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

२३ भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, दिग्दर्शक उमंग कुमार हे चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. अभिनेते परेश रावल हे मोदींच्या नंतरच्या काळातील भूमिकेत दिसणार आहेत. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकतेच चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले असून, याच महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.  

बॉलिवूडमध्ये सध्या ‘बायोपिक’चा ट्रेंड आहे. त्यातही येत्या वर्षभरात राजकारण्यांच्या बायोपिक दिसणार आहेत. आधी डॉ. मनमोहनसिंग, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे आणि आता नरेंद्र मोदी अशा तीन दिग्गज नेत्यांचे जीवनपट येत आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर त्यातील भूमिकेसाठी गेल्याच आठवड्यात विवेक ओबेरॉयच्या नावाची घोषणा करण्यात आली. बराच काळ विवेक इंडस्ट्रीपासून दूर असल्यामुळे त्याच्या नावाची घोषणा हा अनेकांसाठी कुतुहलाचा विषय ठरला आहे. 

दरम्यान चित्रपटातील भूमिकेसाठी विवेकच्या नावाची घोषणा झाल्यानंतर याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. विवेकला अनेकांनी यावरून ट्रोल केले, तर पोस्टरमधील विवेकचा लूक पाहून तो खरोखरीच मोदींच्या जवळ जाणारा आहे, अशा शब्दांत अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.   
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link