Next
‘वाचन कट्ट्याचा उपक्रम ही सकारात्मक गोष्ट’
बुलढाणा जिल्हा परिषद सदस्य व व्याख्याता जयश्री शेळके यांचे प्रतिपादन
BOI
Wednesday, December 19, 2018 | 01:03 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘वाचाल तर वाचाल या उपक्रमाअंतर्गत वाचन कट्ट्याचे उद्घाटन करणे माझ्यासाठी खूप आनंद व अभिमानाची गोष्ट आहे. पुस्तके डिजिटल वाचता येणे शक्य झाले, तरीही हातात पुस्तके घेऊन वाचनाची संस्कृती आजही आपल्याकडे जोपासणारे मोळक कुटुंबासारखे अनेकजण आहेत. या कार्यक्रमातून मी एक ऊर्जा घेऊन जात आहे. काही तरुण एकत्र येऊन हा उपक्रम सुरू करत आहेत ही सकारात्मक गोष्ट आहे,’ असे प्रतिपादन बुलढाणा जिल्हा परिषद सदस्य व व्याख्याता जयश्री शेळके यांनी केले.

शिवस्फूर्ती प्रतिष्ठान, शिवस्पर्श प्रकाशन व जिजाऊ ग्रंथालय यांच्या वतीने ‘वाचाल तर वाचाल’ या उपक्रमाअंतर्गत वाचन कट्ट्याचे उद्घाटन शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी पुणे मनपा सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, शिवस्फूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ॲड. शैलजा मोळक, सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते रवी झेंडे व अर्चना झेंडे उपस्थित होते.‘वाचन हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. पुस्तके आपले मस्तक सशक्त करतात. पुस्तके आपल्याला घडवतात. वाचनकट्टा गावोगावी निर्माण करणे आज काळाची गरज आहे. आजची तरुणाई या उपक्रमासाठी पुढे येत आहे ही कौतुकास्पद गोष्ट आहे,’ असे शेळके यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे आपण न वाचलेल्या पुस्तकांची माहिती होईल व ते वाचायचे असल्यास सोपे जाईल. आपला बौद्धिक व वैचारिक विकास होण्यास यामुळे मदतच होईल या विश्वासाने डॉ. स्वप्नील चौधरी व गणेश सुतार या दोघांनी हा उपक्रम प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू केला. या प्रसंगी प्रत्येकाने आपण वाचलेल्या व आवडलेल्या पुस्तकावर व्यक्त होऊन ते पुस्तक आपण का वाचावे हे सांगितले.या वेळी ज्ञानेश्वर मोळक, रवी झेंडे, अर्चना झेंडे, डॉ. चौधरी, आशुतोष पाटील, गणेश सुतार, प्रज्ञेश मोळक, पूर्वल खरात, सुशांत सरडे, योगिता मालुसरे यांनी आपण वाचलेल्या पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. चौधरी यांनी केले. सुतार यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link