Next
‘गिरिप्रेमी’च्या गिर्यारोहकांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
BOI
Thursday, July 18, 2019 | 11:46 AM
15 0 0
Share this article:

गिरिप्रेमीच्या शिखरवीरांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतातील अग्रगण्य गिर्यारोहण संस्था गिरिप्रेमीच्या संघाने जगातील तिसरे उंच शिखर ‘माउंट कांचनजुंगा’वर यशस्वी चढाई करून भारतीयच नव्हे, तर जगाच्या गिर्यारोहण इतिहासामध्ये नवा अध्याय रचला. या संघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी सर्व संघाचे कौतुक केले आणि महाराष्ट्राचे व भारताचे नाव जगाच्या नकाशावर उज्ज्वल केल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. 


या वेळी कांचनजुंगा मोहिमेचे नेते व श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते उमेश झिरपे, गिरिप्रेमीचे उपाध्यक्ष चंदन चव्हाण, एव्हरेस्ट व कांचनजुंगा शिखरवीर भूषण हर्षे, आनंद माळी कृष्णा ढोकले आणि कांचनजुंगा शिखरवीर विवेक शिवदे, जितेंद्र गवारे, किरण साळस्तेकर यांच्यासह गिर्यारोहक ओंकार हिंगे उपस्थित होते. मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव भूषण गगराणी हेदेखील या वेळी उपस्थित होते.

१५ मे २०१९ च्या पहाटे गिरिप्रेमी संस्थेतील १० गिर्यारोहकांनी जगातील तिसरे उंच शिखर माउंट कांचनजुंगावर यशस्वी चढाई केली. ही मोहीम कांचनजुंगा शिखर चढाई करण्यात यशस्वी ठरलेली सर्वात मोठी व सर्वात पहिली नागरी मोहीम ठरली आहे. एकाच दिवशी एकाच संस्थेतील दहा गिर्यारोहकांनी कांचनजुंगा शिखरमाथ्यावर चढाई करण्याची पहिलीच वेळ आहे. यातून एक नवा विश्वविक्रम गिरिप्रेमीच्या गिर्यारोहकांनी प्रस्थापित केला आहे. या मोहिमेच्यावेळी फक्त भारतीयच नव्हे तर विविध देशांतून आलेल्या ३० हून अधिक गिर्यारोहकांचे नेतृत्वदेखील गिरिप्रेमीने केले. अशा विविध गोष्टींमुळे ही मोहीम वैशिष्ट्यपूर्ण ठरली. ही सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. त्यांनी गिरिप्रेमीच्या जिद्दीचे व चिकाटीचे कौतुक केले व पुढील मोहिमांसाठी शुभेच्छा दिल्या.   
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search