Next
२५ टक्के भारतीय दातदुखी व संवेदनेने त्रस्त
प्रेस रिलीज
Saturday, January 27 | 03:25 PM
15 0 0
Share this story

मुंबई : आरोग्य विम्याचा अंतिम निर्णय घेताना आपण त्यात डेंटल कव्हर आहे का हे पाहतो का? २५ टक्के भारतीय दातदुखी आणि संवेदनेने त्रस्त आहेत. इतकेच नाही तर, भारतातील पाच प्रौढांपैकी दोनजण वर्षातून एकदा तरी कोणत्या ना कोणत्या दातदुखीला सामोरे जातात. ही आयएमआरबीद्वारे कार्यान्वित आणि कोलगेटद्वारे घेतलेल्या ‘कंझ्युमर युसेज अँड अॅटिट्यूड स्टडी’ (सीयुएएस), या २०१६मधील ग्राहक सर्वेक्षणातील आकडेवारी तुमच्या आरोग्य विमा एजंटने तुम्हाला सांगितली आहे का?

या संदर्भामुळे आपल्या देशातील लोकांचे मौखिक आरोग्य वाईट स्थितीत आहे, हे स्पष्ट होते. ४० टक्के भारतीय दाताच्या आजारामुळे ग्रस्त असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. तोंडाच्या इतर आजारामध्ये तीव्र संवेदना आणि दातदुखीचे प्रमाण ६३ टक्के असून, या भारतातील दोन महत्त्वाच्या दातदुखीच्या समस्या आहेत. 

शारीरिक स्वास्थ्याबद्दल जागरूक असलेल्या या पिढीसाठी, व्हायटिंग/दातांचे विकृतीकरण हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. सर्वेक्षणातून काढलेल्या निष्कर्षांवरून असे दिसून येते की, दातदुखीची समस्या ही मध्यमवयीन लोक आणि कमी एसईसी यामध्ये अधिक आहे. प्रत्येक दातदुखीच्या तक्रारीत घरच्या घरी उपाय म्हणून लोकांमध्ये लवंग हा लोकप्रिय प्रकार अजूनही वापरला जातो. सर्वेक्षणानुसार, २६-४५ या वयोगटातील साधारण ४२ टक्के लोक हे दातदुखीने ग्रस्त असून, त्यांना ही समस्या गरम/थंड अन्न, गोड पदार्थ वा काहीतरी चावण्यामुळे जाणवते.

स्रोत : कंझ्युमर युसेज अँड अॅटिट्यूड स्टडी, आयएमआरबीद्वारे कार्यान्वित आणि कोलगेटद्वारे घेतलेल्या सर्व्हेनुसार

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link