Next
‘ऑनगो’द्वारे ‘हॉकीस्टीक मीडिया’चे अधिग्रहण
प्रेस रिलीज
Friday, September 21, 2018 | 05:17 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ग्राहकांसाठी एंड-टू-एंड डिजिटल रूपांतरण सक्षम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा भाग म्हणून ऑनगो फ्रेमवर्कने अलीकडेच रोख अधिक इक्विटी सौद्यामध्ये हैदराबाद येथील हॉकीस्टीक मीडियाचे अधिग्रहण केले आहे.

श्रीकांत कटकूरवार, अभिजित गोगोई आणि अम्बुजम या पूर्वीच्या गुगलर्सनी स्थापन केलेली प्रीमियम डिजिटल मार्केटिंग एजेंसी हॉकीस्टीक मीडियाने एंड-टू-एंड डिजिटल मार्केटिंग उपाय प्रदान करण्यास अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेत लवकरच स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी अमेरिका आणि इंग्लंडमधील डिजिटल एजन्सीजना समर्थन प्रदान करण्यासोबतच भारतातील बऱ्याच एसएमई व वेगाने विकसित होणाऱ्या स्टार्टअपसोबत काम केले आहे.

ऑनगोचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी रामा कुप्पा म्हणाले, ‘हजारो ग्राहक व चॅनेल भागीदारांना सेवा प्रदान केल्यानंतर आम्हाला जाणवले की बहुतांश कंपन्यांना आपल्या डिजिटल संपत्तीचा लाभ घेणे आणि त्याला प्रोत्साहन देणे आव्हानात्मक वाटते. धोरणात्मकरित्या, ‘हॉकीस्टीक’चे अधिग्रहण हे अंतर भरण्यासाठीच केले आहे. यापुढे, हॉकीस्टीक टीम नवीन ग्राहक अधिग्रहण करणे, त्यांचा ब्रँड स्थापित करणे, अपेक्षित आरओआय मिळवण्यास मोहीम चालवणे, प्रशिक्षण देणे आदी गोष्टींसाठी मदत करण्यात सामील असेल. खरे म्हणजे, आमच्या चॅनेल भागीदारांना त्यांच्या डिजिटल मार्केटिंग व लीड जनरेशन प्रयत्नांना सुरळीत करण्यासही हॉकीस्टीक सेवांची गरज भासेल.’

एक दशलक्ष डॉलर एंजेल गुंतवणुकीच्या जोरावर ‘हॉकीस्टीक’चे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. क्रमिक गुंतवणूकदार आणि अनुभवी एंजेल गुंतवणूकदार मितेश मजिठीया या एंजेल निधीपुरवठ्यामध्ये आघाडीवर होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link