Next
पेटीएमवर अतिरिक्त शुल्काशिवाय रेल्वे तिकिट आरक्षण सुविधा
प्रेस रिलीज
Wednesday, December 19, 2018 | 06:03 PM
15 0 0
Share this story


मुंबई : भारतातील सर्वात मोठा डिजिटल पेमेंट मंच पेटीएमने रेल्वे तिकीट आरक्षणावरील सर्वप्रकारचे व्यवहार शुल्क, पेमेंट गेटवे आणि सेवा शुल्क माफ केले आहे. त्यामुळे आता पेटीएमवरून कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय रेल्वे तिकिटांचे आरक्षण शक्य होणार आहे. 

पीएनआर स्थिती पाहण्यापासून ते एक मिनिटाच्या आत तिकिटाचे आरक्षण करण्यापर्यंत आणि तिकीट रद्द केल्यास तत्काळ रिफंडच्या सोयीपर्यंत सर्व सेवा देणारी पेटीएम ही रेल्वे तिकीटांच्या आरक्षणासाठीची सर्वाधिक पसंतीची सुविधा ठरत आहे.   

पेटीएमचे उपाध्यक्ष अभिषेक राजन म्हणाले, ‘आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, वापरकर्ते आता सेवा शुल्क, पेमेंट गेटवे शुल्क किंवा कोणत्याही प्रकारचे सुविधा शुल्क दिल्याशिवाय पेटीएमवर रेल्वे तिकीटांचे आरक्षण करू शकतात. रेल्वे  तिकीटांचे आरक्षण करण्यासाठी एक अत्यंत किफायतशीर आणि सुलभ मार्ग म्हणून अधिकाधिक प्रवाशांनी ऑनलाइन आरक्षणाचा मार्ग अवलंबावा यासाठी हे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे पेटीएमवरून होणारी बहुतांशी तिकीट आरक्षणे ही त्यांच्या मोबाइल अॅपवरून होतात. यादृष्टीने पहिल्यांदाच वापर करणाऱ्यांसाठी ऑनलाइन रेल्वे तिकिटे सहज आरक्षित करता यावीत म्हणून अनेक नवीन वैशिष्ट्ये दाखल करण्यात आली आहेत. वारंवार प्रवास करणारे लोक अतिरिक्त माहिती न भरता झटपट आरक्षण करू शकतात. त्याशिवाय प्रवासी आपली पीएनआर स्थिती तपासू शकतात. शहर, गाव, प्रसिद्ध स्थळ शोधू शकतात आणि त्यासाठी सर्वात जवळच्या रेल्वे स्टेशनबद्दल माहिती मिळवू शकतात.’

‘ऑनलाइन प्रवास क्षेत्रात दाखल होणारी पेटीएम ही भारताची पहिली डिजिटल पेमेंट कंपनी आहे. गेल्या वर्षी पेटीएमच्या प्रवास व्यवसायात तिप्पटपेक्षा जास्त वृद्धी झाली. २०१८ या वर्षात तीन कोटींपेक्षा जास्त तिकीटांची विक्री झाली’, असेही त्यांनी नमूद केले.   
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link