Next
भारतीय विद्या भवनमध्ये २५ एप्रिलला ‘संगत संगोष्ठी’
प्रेस रिलीज
Thursday, April 18, 2019 | 01:11 PM
15 0 0
Share this article:

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘संगत संगोष्ठी’ या कथक नृत्य, साथसंगत या विषयावर सप्रयोग चर्चासत्रचे आयोजन २५ एप्रिल २०१९ रोजी केले असल्याची माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.

शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था आणि नृत्यवेध कथक नृत्य संस्था यांच्या वतीने हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. हा कार्यक्रम २५ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता सेनापती बापट रस्त्यावरील भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात होईल.

निखिल फाटक, डॉ. चैतन्य कुंटे, सुनील अवचट, चिन्मय कोल्हटकर, मृण्मयी फाटक, आमोद कुलकर्णी, डॉ. माधुरी आपटे हे कलाकार यात सहभागी होणार आहेत. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा हा ७४वा कार्यक्रम असून, तो विनामूल्य आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
गुरुवार, २५ एप्रिल २०१९
वेळ : सायंकाळी पाच वाजता
स्थळ : भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता, पुणे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search