Next
‘एमजी हेक्टर’च्या बुकिंगला चार जूनपासून सुरुवात
प्रेस रिलीज
Thursday, May 30, 2019 | 06:18 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : एमजी (मॉरिस गॅरेजेस) मोटर इंडियाने भारतातील या पहिल्या एमजी हेक्टरची बुकिंग चार जून २०१९पासून सुरू होत असल्याची ३० मे रोजी केली घोषणा केली.

‘एमजी’ आपल्या वेबसाइट ‘एमजीमोटर.को.इन’वर चार जूनला दुपारी १२ वाजता ऑनलाइन बुकिंग सुरू करणार आहे आणि सुरवातीला भारतातील १२० केंद्रावर सपोर्ट देणार आहे. कारचे निर्माता या वर्षी सप्टेंबरपर्यंत त्यांची क्षमता एकूण २५० केंद्रापर्यंत वाढवण्याचे ध्येय बाळगून आहे. एमजी मोटर लवकरच भारतातील आपल्या ५० केंद्राच्या नेटवर्कला हलोल कारखान्यातून हेक्टरचे वितरण करण्यास प्रारंभ करणार आहे.

या प्रसंगी एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, ‘नवीन युगातील भारतीय ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यास एमजी हेक्टरला उच्च दर्जाच्या स्थानिक सामग्रीने विकसित केले आहे. ही ५०+ कनेक्टेड वैशिष्ट्ये असलेली भारताची पहिली इंटरनेट कार असल्याने हेक्टर १९ विशेष उत्पादन वैशिष्ट्यांसह सादर केली आहे, ज्यामुळे ती तिच्या गटात नवीन बेंचमार्क बनलेली आहे. ग्राहक लवकरच हेक्टरचा आनंद घेऊ शकतील आणि आम्ही एमजीच्या दुनियेत नवीन ग्राहकांचे स्वागत करण्यास तयार आहोत.’

‘भारतात बहुप्रतिक्षित ओक्टॅगोनल बॅजचे युग आरंभ करताना एमजी हेक्टर इंटरनेटद्वारे सुसज्जित होऊन दाखल झाली आहे. पुढील पिढीचे आयस्मार्ट तंत्रज्ञान सुरक्षित, कनेक्टेड आणि मस्तीचा अनुभव प्रदान करण्याचे आश्वासन देत आहे. श्रेणीतील सर्वांत मोठी १०.४इंच एचडी टचस्क्रीन आहे आणि ‘एमजी’ची विशेष सिग्नेचर डिझाइन क्यु दिलेली आहे, ज्यात प्रसिद्ध स्टार-रायडर ग्रीलचा समावेश आहे. तिचा भौमितीय आकार, क्षैतिज प्रवाह आणि सममितीने डिझाइन केलेला आहे, तर हेक्टरच्या अंतर्भागाचे काही भाग आधुनिक नृत्य प्रकारांपासून प्रेरित आहेत,’ असे त्यांनी या प्रसंगी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search