Next
‘होंडा’चे वितरक नेटवर्क एक हजारांवर
भारतीय दुचाकी क्षेत्रातील सर्वांत वेगवान नेटवर्क विस्तार
प्रेस रिलीज
Tuesday, April 02, 2019 | 05:08 PM
15 0 0
Share this article:चंदीगढ : ग्राहकांच्या अधिक जवळ जात होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने (एचएमएसआय) मोहाली (पंजाब) येथील प्लॅटिनम होंडाचे उद्घाटन करत एक हजारावे होंडा एक्सक्लुसिव्ह ऑथोराइज्ड डीलर (एचईएडी ) सुरू करत असल्याचे जाहीर केले.

आपल्या नेटवर्कची संख्या दुप्पट केलेली आणि गेल्या पाच वर्षांत तीन हजार ३०० नवे टच- पॉइंट्सचे उद्घाटन करणारी ‘होंडा’ ही भारतीय दुचाकी क्षेत्रातील एकमेव कंपनी आहे. यामुळे ‘होंडा’चे भारतातील एकूण नेटवर्क सहा हजार दालनांच्या विक्रमी टप्प्यावर पोहोचले आहे.

याबद्दल बोलताना ‘एचएमएसआय’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिनोरू कातो म्हणाले, ‘एक हजाराव्या होंडा वितरक उद्घाटनासाठी उपस्थित असल्याचा मला आनंद होत आहे. ‘होंडा’ने आपल्या ग्राहकांना या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत सहा हजार नेटवर्क टचपॉइंट्स पुरवण्याची बांधिलकी पूर्ण केली आहे. या टप्प्यामुळे ‘होंडा’ या ब्रँडवर विश्वास ठेवणाऱ्या आपल्या ग्राहकांच्या आणखी जवळ गेली आहे.’‘‘होंडा’ सातत्याने देशभरात विस्तार करत आहे आणि ग्राहकांना अखेरच्या टप्प्यापर्यंत कनेक्टिव्हिटी पुरवत आहे. कामकाज सुरू झाल्यापासून ‘होंडा’ने आपली उत्पादनक्षमता लक्षणीय प्रमाणात वाढवत विविध प्रकारची उत्पादने सादर केली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानासह सर्वोत्तम दर्जाच्या उत्पादनांची निर्मिती करत कंपनी आपले नेटवर्क अशाचप्रकारे मजबूत करत राहील. सर्व होंडा ऑथोराइज्ड एक्सक्लुसिव्ह डीलरशीपद्वारे (एचईएडी) सेल्स, सर्व्हिस, स्पेयर्स, सेफ्टी व्यवस्था पुरवली जाते; ‘होंडा’ने प्रशिक्षित केलेले कुशल कर्मचारी सर्व ग्राहकांना दर्जेदार विक्री आणि विक्री-पश्चात सेवा पुरवतात,’ असे कातो यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search